Google Ad
Editor Choice

विकास कामांची गती वाढणार … शंकरशेठ जगताप यांनी केली नवी सांगवीतील विकास कामांची पाहणी …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ जानेवारी) : नवी सांगवीकरांना सुविधा द्यायच्याच आहे, आरोग्य साफसफाई, रस्त्यांची कामे, सौंदर्यीकरण असेल, नदीसफाई असेल, पण हे करतांना सांगवीकरांना दिलासाही द्यायचा आहे. सांगवीकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने कररूपी पैसा देणारा हा पिंपरी चिंचवडकर शहराच्या विकास कामांमध्ये मोलाचे योगदान देतो. पण त्याला परत काय मिळतं हा खरा प्रश्न आहे. त्याच उत्तर माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या कार्यातून आणि धावपळीतुन दिसून येत आहे.

मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर पाच वर्षे काहीच बोलत नाहीत,  पण भाजपा हे असे अजिबात करत नाही, असे आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्या नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांतून पिंपरी चिंचवडकरांना दाखवून दिले आहे. त्याचीच प्रचिती आज नवी सांगवीकरांनी पाहिली.

Google Ad

आमदार ‘लक्ष्मण जगताप’ यांचे शहरात चाललेल्या विविध विकास कामांवर बारकाईने लक्ष असते, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक ‘शंकरशेठ पांडुरंग जगताप’ यांनी प्रभाग क्रं. ३१ नवी सांगवी पिं चिं मनपा अंतर्गत चाललेल्या विवीध विकासकामांची पाहणी केली, आणि कामांविषयी सूचना संबंधित अधिकारी व ठेकेदारांना देण्यात आल्या.

या वेळी नगरसेवक अंबरनाथ कांबळे, माधवीताई राजेंद्र राजापुरे [ सभापती शिक्षण मंडळ पिं चिं मनपा ], अनिल राऊत [ कार्यकारी अभियंता ], विजयसिंह भोसले [ कार्यकारी उपअभियंता ],विजय कांबळे – [ कनिष्ठ अभियंता ],प्रिती यादव [कनिष्ठ अभियंता जलनित्सारण विभाग ], भिमराव चाौधरी [ सुपरवाझर स्थापत्य विभाग ], राजकुमार मानमोडे [ सल्लागार प्रतिनिधी ] सामाजिक कार्यकर्ते गणेश बनकर, राजू नागणे, मिलिंद कंक, उद्धव कवडे, संदीप दरेकर, साईश कोकाटे तसेच ठेकेदार आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!