Google Ad
Editor Choice Education

Maval : प्रा. लक्ष्मण शेलार सर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त अमरसावित्री कार्यगौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ जानेवारी) : श्री. प्रा. लक्ष्मण शेलार सर यांच्या वाढदिवस / अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या व्यक्तींना अमरसावित्री कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. सदर पुरस्कार सोहळा शारदाआश्रम प्राथमिक आश्रमशाळा शिरगाव मावळ येथे संपन्न करण्यात आला.

आपण समाजात राहतो समाजाचे काहीतरी देणे लागतो,समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून मागील पाच वर्षांपासून समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना आपल्या आई वडिलांच्या नावाने अमरसावित्री कार्यगौरव पुरस्कार देण्यात येतो व आतापर्यंत पाच वर्षात जवळजवळ 20 पुरस्कार देण्यात आले त्यामध्ये पाच कर्तृत्ववान महिला, पाच कर्तृत्वावान पुरुष, पाच सामाजिक संस्था, पाच कलाकार आदी पुरस्कार दिले आहेत तसेच कोणत्याही मोठ्या स्वरूपात कार्यक्रमाचे आयोजन न करता एखादया गरजू अंध, अनाथ, अपंग, वृद्धाश्रम, अनाथआश्रम, वस्तीगृह, आश्रमशाळा अश्या ठिकाणी पुरस्कारार्थीना बोलावून हे पुरस्कार दिले जातात जेणेकरून उपस्थित सर्वजण त्या संस्थेशी संलग्न राहून काहीतरी यथोचित मदत करतील असा उदात्त हेतू ठेऊन आपण हे पुरस्कार देत आहोत व भविष्यात देखील हे काम चालू राहील असे मत आपल्या प्रास्ताविक मध्ये अभिष्टचिंतन सोहळ्याचे सत्कारमूर्ती श्री. प्रा. लक्ष्मण शेलार यांनी मांडले.व पुरस्कार प्राप्त सर्वाना शुभेच्छा दिल्या.

Google Ad

कार्यक्रमाची सुरुवात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिववंदना घेण्यात आली.तदनंतर शारदाआश्रम प्राथमिक शाळेच्या वतीने उपस्थित सर्वांचे स्वागत श्री.लोखंडे सर यांच्या शुभहस्ते करण्यात आले व पुरस्कार प्राप्त व्यक्तींना शुभेच्छा देण्यात आल्या.शारदाआश्रम शाळेतील विविध उपक्रम व माहिती श्री.चव्हाण सर यांनी दिली.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये प्रामुख्याने अखिल भारतीय युवक मराठा महासंघ तालुका अध्यक्ष श्री. शंकर पोकळे, उपाध्यक्ष श्री. गणेश पवार, प्रदेश उपाध्यक्ष करणसिंह मोहिते, अखिल भारतीय युवक मराठा महासंघ मावळ तालुका अध्यक्ष श्री. चेतन वाघमारे, युवा उद्योजक रामभाऊ गोपाळे, श्री. योगेश महाराज चोपडे तसेच शारदाआश्रम शाळेतील सर्व शिक्षक वृंद व काही विध्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाकूरद्वारे सर, मानपत्रवाचन श्री. देविदास आडकर सर तर उपस्थित सर्वांचे आभार श्री. चेतन वाघमारे यांनी मानले. कोरोनाच्या सर्व नियमावलीचे पालन करून कार्यक्रम घेण्यात आला.

2022 अमरसावित्री कार्यगौरव पुरस्कार प्राप्त व्यक्ती :-
श्री. रणजीत दादा जगताप पुणे.
( प्रदेशाअध्यक्ष : अखिल भारतीय युवक मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य )
श्री. गिरीष परदेशी पुणे.
( मराठी सिनेअभिनेते : मराठी चित्रपट फॉरेनची पाटलीण )
श्री. दिनेश ठोंबरे मावळ.
( अध्यक्ष: शिववंदना संघटना महाराष्ट्र )
श्री. बळीराम शिंदे मावळ
( सायकलपट्टू : पुणे ते कन्याकुमारी )
कु. अक्षय खिरिड मावळ.
( मॉडेल + कास्टिंग डायरेक्टर )

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!