Google Ad
Editor Choice Education

जुनी सांगवी येथील शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यालय व नूतन माध्यमिक विद्यालय शाळेत … शिक्षणाची गुढी उभारून विद्यार्थ्यांचे स्वागत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ जून) :- जुनी सांगवी येथील शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यालय व नूतन माध्यमिक विद्यालय शाळा सांगवी प्रवेशोत्सवा निमित्त नवागतांचे गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले शैक्षणिक वर्षाची सुरुवात शिक्षणाची गुढी उभारून करण्यात आली पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या मुलामुलीचे चॉकलेट,गुलाब पुष्प व पाठ्यपुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.

संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्रशांत शितोळे, खजिनदार रामभाऊ खोडदे, सचिव तुळशीराम नवले, विषय तज्ञ दत्तात्रेय गवळी, मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी नवागतांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संस्थेचे सचिव मा.तुळशीराम नवले म्हणाले आजच्या स्पर्धेच्या युगात अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांनी अवांतर वाचनाकडे लक्ष देणे गरजेचे आहे त्यासाठी नव्याने काही चांगले उपक्रम शाळेमध्ये राबवले पाहिजेत. सर्वांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देतो असे ते म्हणाले यावेळी सर्व शाळा सजविण्यात आली होती. मुलांना ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत शाळेत आणण्यात आले मुले आनंदाने नाचत शाळेत आली. सर्व शालेय परिसर आनंदाने धुमधुमुन गेला होता सर्व मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

Google Ad

यावेळी पालक संजय चव्हाण, समीर ढेरांगे बहुसंख्य पालक, विध्यार्थी उपास्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सुनिता टेकवडे, भाऊसो दातीर, सीमा पाटील, हेमलता नवले, मनीषा लाड, स्वप्नील कदम, शीतल शितोळे, दिपाली झणझणे, श्रध्दा जाधव, भाग्यश्री रापटे, गायत्री साखरे, संध्या पुरोहित, संगीता सुर्यवंशी, निता ढमाले, निर्मला भोईटे, मनीषा गायकवाड, कुसुम ढमाले, यांनी परिश्रम घेतले, प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक शिवाजीराव माने यांनी व सूत्रसंचलन व आभार दत्तात्रय जगताप यांनी केले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!