Google Ad
Editor Choice

मोटार सायकली चोरी करणारी अंतरजिल्हा टोळी जेरबंद , १७ मोटार सायकली हस्तगत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ जून) : पिंपरी चिंचवड शहरामध्ये वाढत्या दुचाकी चोरीस आळा घालण्याचे दृष्टिने पोलीस आयुक्त श्री . अंकुश शिंदे सो . यांनी दिलेल्या सुचनेस अनुसरून गुन्हे शाखा युनिट १ कडील पोलीस पथकाने आरोपींचा माग काढुन चाकण चौक येथे सापळा लावुन थांबले असता एका मोटार सायकली वरून तीन इसम संशयीत रित्या खेड कडुन येत असताना दिसुन आले .

पोलीसांना पाहून ते पळुन जात असताना पो ना , १४१७ सचिन मोरे व पो.शि. १७ ९ १ प्रमोद गर्जे यांनी त्याचा एक कि.मि. पाठलाग करुन शिताफ़िने पकडले . त्यांना नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे *१ ) प्रज्वल प्रताप देशमुख , वय २० वर्षे , रा . वरवटे मळा , जवळेकडलग , ता . संगमनेर , जि . अहमदनगर , २ ) अक्षय लहानु जाधव , वय २७ वर्षे , रा.न्यु तांबे हॉस्पीटल समोर , बटवाल मळा , संगमनेर ता . संगमनेर , जि . अहमदनगर* असे सांगितली त्याचेकडे चौकशी केली ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागल्याने त्यांना युनिट १ कार्यालयात आणुन सखोल चौकशी केली असता त्याचे ताब्यात असलेली मोटार सायकल ही त्यांनी म्हाळुंगे , चाकण परीसरातुन चोरी केल्याचे उघड झाल्याने त्यांना चाकण पोलीस स्टेशन कडील गु.रजि . नं . ७६८/२०२२ भादवि कलम ३७९ या वाहन चोरीचे गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली .

Google Ad

आरोपी यांची पोलीस कस्टडी घेवुन तपास करता त्यांनी त्यांचा संगमनेर येथील साथीदार तुषार फटांगरे , रा . संगमनेर , जि . अहमदनगर व एक अल्पवयीन साथीदारासह पिंपरी चिंचवड , पुणे ग्रामीण , नाशिक या परीरातुन मोटार सायकली चोरी करून त्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर , पाथर्डी , अकोले येथे त्यांचे ओळखिचे लोंकाना विक्री केल्याचे सखोल तपासामध्ये उघड झाले . त्यानुसार त्यांचा साथीदार *तुषार भारत फटांगरे , वय २१ वर्षे , रा.मु.पो.पोखरी बाळेश्वर , ता . संगमनेर , जि . अहमदनगर* यास संगमनेर परीसरातुन ताब्यात घेवुन त्यासही दाखल गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे .

पोलीस कोठडी दरम्यान आरोपी हे संगमनेर येथे मोटार सायकली वरून पुणे नाशिक रोडवरील चाकण , राजगुरुनगर , नारायणगाव , आळेफ़ाटा व नाशिक परीसरात येवुन मोटार सायकल चोरी करून रातोरात परत जात असे व चोरीलेल्या मोटार सायकली हयापरीचीत लोकांना कागदपत्र नंतर देतो असे अश्वासन देवुन विकत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे . आरोपीकडुन त्यांनी त्यांचे ओळखिच्या लोकांना विकलेल्या *एकुण ९ लाख ४५ हजार रूपयांच्या १७ मोटार सायकली* हस्तगतकरण्यात आल्या असुन खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आले आहेत .१. चाकण पो.स्टे.गु.रजि . नं . ३४४/२०२२ भादवि कलम ३७९

२. चाकण पो.स्टे .गु .रजि . नं .
७७९/ २०२२ भादवि कलम ३७९

३. चाकण पो.स्टे.गु.रजि . नं . ३४४/२०२२ भादवि कलम ३७९

४. चाकण पो.स्टे.गु. रजि . नं . ७७२/२०२२ भादवि कलम ३७९

५. चाकण पो.स्टे.गु.रजि . नं .
९६२/२०२२ भादवि कलम ३७९

६. चाकण पो.स्टे . गु . रजि . नं .
९०९/२०२२ भादवि कलम ३७९

७. चाकण पो.स्टे.गु.रजि . नं .
७६८/२०२२ भादवि कलम ३७९

८. नारायणगाव पो.स्टे . पुणे ग्रामीण गु.रजि . नं .६१/२०२२ भादवि कलम ३७ ९

९ . नारायणगाव पो.स्टे . पुणे ग्रामीण गु.रजि.नं. १४०/२०२२ भादवि कलम ३७९
१०. खेड पो.स्टे . पुणे ग्रामीण गु.रजि . नं . ३९०/२०२२ भादवि कलम ३७९

११.आळेफाटा पो.स्टे . पुणे ग्रामीण गु.रजि.नं. १५१/२०२२ भादवि कलम ३७९

१२. लोणी पो.स्टे . जि .अहमदनगर गु.रजि . नं.९८/२०२२ भादवि कलम ३७९

१३. भद्रकाली पो.स्टे . नाशिक शहर गु.रजि . नं .१२७/२०२२ भादवि कलम ३७९

१४. नाशिक रोड पो.स्टे . नाशिक शहर गु . रजि . नं . ११३/२०२२ भादवि कलम ३७९

१५. नाशिक रोड पो.स्टे . नाशिक शहर गु . रजि . नं . ११२/२०२२ भादवि कलम ३७९

१६. नाशिक रोड पो.स्टे . नाशिक शहर गुरजि . नं . ८९ / २०२२ भादवि ३७९

१७. मुंबई नाका पो.स्टे . नाशिक शहर गु . रजि . नं . १०१ / २०२२ भादवि कलम ३७९

*अटक आरोपी अक्षय लहानु जाधव हा संगमनेर ग्रामीण पोलीसांचे रेकॉर्ड वरील असुन त्याचे विरूध्द वाहन चोरी व इतर चोरीचे गुन्हे दाखल आहेत .*

सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री अंकुश शिंदे , अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय शिंदे , पोलीस उप आयुक्त डॉ काकासाहेब डोळे , सहायक पोलीस आयुक्त डॉ प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा , युनिट १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर तसेच पोलीस अंमलदार प्रमोद गर्जे , सचिन मोरे , फारूक मुल्ला , अमित खानविलकर , गणेश महाडीक , सोमनाथ बोन्हऱ्हाडे , महादेव जावळे , जावेद पठाण , विशाल भोईर , बाळु कोकाटे , मनोजकुमार कमले , उमाकांत सरवदे , मारुती जायभाये , अजित रूपनवर , प्रमोद हिरळकार , स्वप्निल महाले यांचे पथकाने केली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!