Google Ad
Editor Choice Education

अकरावी प्रवेशासाठीच्या सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर … अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशी असेल?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२०जुलै) : राज्यात इयत्ता अकरावी प्रवेशासाठी प्रथमच प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना सीईटीसाठी (CET) 20 जुलै ते 26 जुलै या कालावधीत परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येईल.

तर सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेतली जाईल. इंग्रजी, गणित (भाग 1 व 2), विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग 1 व 2) सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या प्रत्येक घटकावर प्रत्येकी 25 गुणांचे एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत.

Google Ad

कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी विषयनिहाय 25 टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला असून या अभ्यासक्रमावर सीईटीमध्ये प्रश्न विचारले जातील. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी सीईटीसाठी परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही. मात्र, सीबीएसईसह इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी 178 रुपये शुल्क भरावे लागेल.

 

अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशी असेल?

>> अकरावीची प्रवेशासाठी CET परीक्षा
>> इयत्ता 11 वी प्रवेशासाठी वैकल्पिक (Optional) CET परीक्षा
>> प्रवेश परीक्षेत राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न
>> गुण – 100
>> बहुपर्यायी प्रश्न
>> परीक्षा OMR पद्धतीने
>> परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी
>> कॉलेजमध्ये प्रवेशाचे निकष काय?
>> CET परीक्षेच्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार महाविद्यालयांमध्ये प्रवेश
>> CET परीक्षा देणाऱ्यांना 11 वी प्रवेशप्रक्रियेत प्राधान्य
>> त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रवेश
>> CET परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन इयत्ता 10 वीच्या पद्धतीनुसार

Google Ad

About the author

Maharashtra14 News

9 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!