Google Ad
Editor Choice Maharashtra

सरसंघचालक मोहन भागवत आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर … भाषणाकडे साऱ्यांचं लक्ष

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ जुलै) : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आजपासून 2 दिवस नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक दौऱ्यात सरसंघचालकांच्या प्रमुख उपस्थितीत दोन कार्यक्रम होणार आहे. एका मंगल कार्यालयाचं भागवतांच्या हस्ते उद्घाटन होणार असून नाशिकच्या कुरतकोटी सभागृहात भागवतांचं भाषण देखील असणार आहे. भागवतांच्या प्रमुख उपस्थितीत दोन कार्यक्रम आयुर्वेद व्यासपीठ संघटनेच्या ‘चरक भवन’ या केंद्रीय कार्यालयाचा वास्तूचा लोकार्पण सोहळा आज भागवत यांच्या हस्ते होतोय.

नाशिक मधील गंगापूर रोड वरील शंकराचार्य संकुलातील डॉक्टर कुर्तकोटी सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे. तर गंगापूर रोडवरील नक्षत्र लॉन्स वर स्वामी श्री सवितानंद सेवा समितीच्या वतीने आयोजित स्वामी सवितानंद यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याला देखील भागवत प्रमुख निमंत्रित म्हणून उपस्थिती लावणार आहेत. या दोन्ही ठिकाणी कार्यक्रमांचे प्रक्षेपण फेसबुक आणि यूट्यूब च्या माध्यमातून होणार आहे.

Google Ad

▶️भागवतांच्या भाषणाकडे लक्ष
मोहन भागवत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान मुस्लिम मोहलयांमध्ये संघाच्या शाखा सुरू करण्याबाबत भागवत यांनी नुकतंच वक्तव्य केल्याने,आज दुपारी होणाऱ्या भागवतांच्या भाषणाकडे सगळ्यांच लक्ष लागले आहे.

▶️जवळपास दोन वर्षांनी मोहन भागवत नाशकात येत आहेत. नोव्हेंबर 2019 मध्ये एका स्वयंसेवकांच्या घरी विवाह सोहळ्याच्या निमित्ताने भागवत आले होते. त्यानंतर कोरोना प्रसारामुळे मोहन भागवत यांचा नाशिक दौरा होऊ शकला नाही. मात्र आज कोरोना संसर्गामुळे सरकारने घालून दिलेल्या नियम अटी पाळून हे दोन्ही कार्यक्रम होत आहेत. सरसंघचालकांच्या नाशिक दौऱ्याकडे लक्ष असेल.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

6 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!