Google Ad
Celebrities Editor Choice

सांगवी परिसर महेश मंडळाच्या वतीने महेश नवमी दिना निमित्ताने गुरुकुलास गरजेच्या वस्तू भेट!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२०जून) : सांगवी परिसर महेश मंडळ पुणे ( माहेश्वरी समाज ) महेश नवमी दिन ( समाज उत्पत्ती दिन ) उत्साहात साजरा करण्यात आला नवी सांगवीतील माहेश्वरी चौकात भगवान शंकराच्या मूर्ती ला सकाळी मंडळाच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून नगरसेविका शारदा सोनावणे ह्यांच्या हस्ते आरती करण्यात आली . तदनंतर ग्राम रिहे , तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील वेदांत वारकरी गुरुकुल ( आश्रम शाळा ) येथे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .

सांगवी परिसर महेश मंडळाच्या वतीने गुरुकुलास त्यांना अत्यंत गरजेच्या असलेल्या वस्तू पिठाची गिरणी , बॅटरी , इन्व्हर्टर भेट म्हणून देण्यात आल्या . ह्याचा स्वीकार ह भ प निवृत्ती बोरकर महाराज यांनी स्वीकार केला . या वेळी अध्यक्ष सतीश लोहिया यांनी असे सांगितले कि महेश नवमी निमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या इतर कार्यक्रमाला होणारा खर्च टाळून विधायक कार्यासाठी करण्याचे ठरवले त्या माध्यमातून हया कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले .

Google Ad

यावेळी ह भ प निवृत्ती बोरकर महाराज ह्यांनी कार्यकर्त्यांना नेतृत्व व दातृत्व ह्या विषयांवर मार्गदर्शन केले . ह्या भेटवस्तू गुरुकुलासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत असे प्रतिपादन बोरकर महाराजांनी केले . या वेळी अध्यक्ष सतीश लोहिया , अतुल नावंदर , निलेश अटल , सचिन मंत्री , सत्यनारायण राठी , मनोज अटल , महिला अध्यक्षा पद्मा लोहिया उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर जांभूळकर ह्यांनी केले तर आभार भूषण हरकुट यांनी मानले .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

16 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!