Google Ad
Editor Choice Health & Fitness

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या संकल्पनेतून काळेवाडी प्रभागात मोफत अटल आरोग्य चिकित्सालयाचे उद्घाटन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१जून) : आज २१ जून रोजी जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या संकल्पनेतून गोरगरिबांची मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप या अटल प्रभाग आरोग्यलय या बाह्यरुग्ण(OPD ) चिकित्सालय काळेवाडी पवना नगर शाळेत उभारण्यात आले. त्या चिकित्सालयचे उदघाटन महापौर उषा माई ढोरे व युवा उद्योजक माजी नगरसेवक शंकरशेठ जगताप यांच्या हस्ते काळेवाडी पवना नगर शाळेत करण्यात आले.

त्यावेळी त्या उपस्थितीत स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर माजी नगरसेविका विमल काळे माजी नगरसेविका ज्योतीताई भारती चिटणीस काळूराम नढे वकील आघाडी अध्यक्ष हर्षद नढे डॉ तिरुमनी, सरचिटणीस कैलास सानप, सुरेश पाटील जिल्हाउपध्यक्ष धर्मा पवार, रमेश काळे,भरत ठाकूर सुरेश पाटील संगीता रोकडे नंदा कापुरे सुनीता रोकडे ज्ञानेश्वर काळे, संभाजी नढे व भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक 22 चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

तसेच शंकर जगताप यांनी आज 30 ते 40 च्या नागरिकांना मोफत लसीकरणच्या केंद्रस्थानी भेट देऊन उपस्थित डॉक्टर यांना नागरिकांना लसीकरण दरम्यान कसलीही हेळसांड होणार नाही याची दक्षता घ्यावी कार्यकर्त्यांना ही लसीकरण दरम्यान सहकार्य करण्यास मदत करावी असे सांगण्या आले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement