Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

सांगवी, पिंपळे गुरव,नवी सांगवीत सातव्या दिवशी नियमांचे पालन करत गणरायाला भक्तीभावाने निरोप!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पोलिस प्रशासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करत पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी येथील नागरिकांनी लाडक्या गणरायाची मूर्तीदान केली . महापालिका , पोलिस , स्थानिक मंडळे व संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती करून फिरता हौद व विसर्जन गाड्यांची व्यवस्था करण्यात अली होती .

नवी सांगवी प्रभाग ३१ मध्ये मनपाच्या वतीने चौकाचौकात फिरत्या हौदासह गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती, यावेळी कनिष्ठअभियंता विजय कांबळे, आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य झाल्याचे चौकाचौकात दिसून येत होते. क्रांती चौक मंडळ, सत्ता प्रतिष्ठान मंडळ, शिव प्रतिष्ठान मंडळ, समता नगर मंडळ, समर्थ नगर मंडळ,बारामती मंडळ कृष्णा चौक, आदर्श नगर मंडळ ,आई प्रतिष्ठान, स्वामी विवेकानंद नगर मंडळ, किर्ती नगर मंडळ, महाराष्ट्र मंडळ या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तसेच नागरिकांनीही आपल्या लाडक्या बाप्पाचे विसर्जन मिरवणुक न काढता अगदी शांततेत, संयमत आनंदात पार पडल्याचं दिसत होते.

Google Ad

जुनी सांगवीत शिवसेनेच्या वतीने तसेच सिझन सोशेल वेल्फेअर ट्रस्ट च्या वतीने फिरत्या हौदासह गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती, प्रशांत शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली मित्र परिवाराने ” जबाबदारी आम्हीं घेतो, खबरदारी तुम्ही घ्या” अशी जनजागृती ध्वनिक्षेपकावरून करण्यात येत होती. पाच फिरत्या सजवलेल्या रथातून मूर्ती संकलन करण्यात येत होत्या. यास नागरिकांचा उदंड प्रतिसाद दिसून येत होता, अगदी शांततेत चाललेल्या या शुभकार्याचे दृष्य अगदी विलोभनीय दिसत होते.त्याचे सर्वच थरातून कौतुक होतानाही दिसत होते.

संगवीतील जे डी ग्रुप,श्रीकृष्ण मंडळ,नवयुग मंडळ, आनंद नगर मंडळ, राही माही प्रतिष्ठान, रणझुंजार मंडळ, बालाजी प्रतिष्ठान, मुळा नगर मंडळ यांनी अगदी साध्या पद्धतीने आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.

या वेळी पोलीस आणि मनपा प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले, सांगवी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याचे ठिकठिकाणी दिसत होते तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक रंगनाथ उंडे , अजय भोसले हे परिस्थितीची पाहणी करत सहकार्य करत होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!