Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad Pune

सावधान : पिंपरी चिंचवड,पुण्यात मास्क न वापरल्यास होऊ शकतो एक हजार रुपये दंड !

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क न वापरणाऱ्यांना १००० रुपये दंड करण्याचा विचार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढलं आहे. मात्र तरीही नागरिक आवश्यक ती काळजी घेत नसल्याचं अजित पवार यांचं म्हणणं आहे. मास्क वापरण्यासाठी वारंवार सूचना दिल्यानंतर देखील लोक मास्क वापरत नाहीत आणि त्यामुळे आता दंडाची रक्कम वाढवावी लागेल असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सध्या मास्क वापरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड करण्यात येतो. परंतु आता तो आणखी वाढवण्याचा विचार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे अजित पवार यांनी ही घोषणा पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी केली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते.

Google Ad

पुण्यात परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट बनवलीय. कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढतेय. त्यामुळे आता मास्क घालण्यावर आणखी कडक कारवाईचा बडगा उगारणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलंय. त्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कौन्सिल हॉलला एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकीत दंडाची रक्कम वाढवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणं हे कोरोनाचा हॉटस्पॉट बनलंय. राज्यातील सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ही सध्या पुण्यात आहे. पुण्यातील एकूण रुग्णांची संख्या ही एक लाख तीस हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबईलाही पुण्याने या बाबतीत मागे टाकलंय.

पुण्यात दररोज दोन ते अडीच हजार संख्येमध्ये नवीन कोरुना रुग्णांची नोंद होतेय. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर देखील मोठा ताण पडतोय. गेल्या काही दिवसांमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मिळून ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर सुविधा असलेली चार हॉस्पिटल उभारण्यात आली आहेत. त्यातील दोन हॉस्पिटलचं उद्घाटन आज करण्यात आलं. या चारही हॉस्पिटल्स मध्ये मिळून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. मात्र सातत्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येला ही हॉस्पिटल्स पूर्ण ठरू शकतील का याबद्दल शंका आहे. त्यामुळे लोकांनी काळजी घेण्याची गरज नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय.

याआधी अनेक शहरांमध्ये मास्क न घालणाऱ्यांवर पोलिस कारवाई करत असल्याचं आणि दंड वसूल करत असल्याचं दिसून आलंय. मात्र तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आल्याचे दिसून आलेलं नाही. आता दंडाची रक्कम वाढवून एक हजार रुपये करण्याचा विचार सुरु झाल्यावर तरी लोक व्यवस्थित मास्क वापरण्याकडे वळतील आणि कोरोना रुग्णांच्या संख्येवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल ही अपेक्षा.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!