Google Ad
Editor Choice

सातारा जिल्ह्याची सामाजिक बांधिलकी ही रयत स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून बदलण्यासाठीचे संकेत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ डिसेंबर) : रयत स्वाभिमानी संघटनेची आढावा बैठक सोमवार दि. 26 डिसेंबर सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह सातारा येथे आयोजीत करण्यात आली होती.अशी माहिती रविराज काळे सरचिटणीस यांनी दिली.

रविराज काळे म्हणाले, आज अनेक तरुणांना रोजगाराच्या संधीसाठी इतरत्र भटकावे लागत आहे. येथील कोणत्याही लोकप्रतिनिधींना ही युवा शक्ती विधायकतेने परिपूर्ण बनावी असे वाटत नाही. त्यांच्या निष्क्रीयतेमुळेच आज जिल्ह्यातील औद्योगीकरण ओसाड पडताना आपण पहात आहोत. जनतेने यांना पाच वर्षे सेवेची संधी दिली असताना हे लोकप्रतिनिधी उदासिन भावनेतून या तरुणांना भविष्याची व्होट बँक समजून हे तरुण आपल्याच दारात कसे घुटमळत राहतील, बेकार कसे बनतील यासाठीच सदैव प्रयत्नशील राहिलेले आपण पहात आहोत, असे असताना आज सातारा जिल्ह्याची सामाजिक बांधिलकी ही रयत स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून बदलण्यासाठीचे संकेत निर्माण होवू लागले आहेत. कुटुंब वत्सल, कार्यक्षम आणि संस्कारशिल विचारधारा निर्माण करण्यासाठीच शिव, फुले,शाहु, आंबेडकर यांचे सामाजिक सहिष्णुतेचे विचार जनमाणसात पोहचवण्यासाठी माझ्यासह सर्वच सहकारी कटिबद्ध राहणार असल्याची ग्वाही रविराज काळे यांनी दिली.

Google Ad

ते म्हणाले, युवकांच्या युवा शक्तीला विधायक चेतनेच्या उत्कर्षाप्रती पोहचवण्यासाठी ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती . यासाठी सर्वच पदाधिकारी वर्ग बहुसंख्येने सहभागी होवून आपले कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक जीवनमान उंचविण्यासाठी तत्परता दाखवावी, असे आवाहन रविराज काळे यांनी केले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!