Google Ad
Editor Choice

राज्यात अवैध गौण खनिज उत्खननप्रकरणी वातावरण तापलेले असतानाच पिंपरी चिंचवड मध्येही अप्पर तहसिल कार्यालय यांची मोठी कारवाई

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ डिसेंबर) : राज्यात गुलाबी थंडीमुळे हवामानाचा पारा कमालीचा घटला असला तरी राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण मात्र चांगलेच तापले आहे. नागपूर अधिवेशनात खडसेंच्या सौभाग्यवतींच्या नावे असणाऱ्या जमिनीतून गौण खनिज उत्खननाचा विषय बाहेर काढला गेला.

तर (मालेगाव) नांदगाव येथील अवैध खडीक्रशर प्रकरणात मंडल अधिकाऱ्यानंतर आता तालुक्यातील पिंपरखेडचे तलाठी जयेश मलदुडे यांना कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले.

Google Ad

हे वातावरण तापलेले असतानाच पिंपरी चिंचवड शहरात आज सकाळी ८.०० वा. नदी मुकाई चौक रावेत या ठिकाणी अप्पर तहसीलदार गीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अनाधिकृत गौण खनिज वाहतूकीवर कारवाई करण्यात आली. कारवाई मध्ये ९ वाहना कडून ४ लाख २० हजार रुपये एवढी दंडाची रक्कम वसूल करणेत आली.

सदरची कारवाई प्रविण ढमाले पिंपरी चिंचवड चे नायब तहसिलदार यांनी केली, असून त्याचे सोबत तलाठी अतुल गीते, कविता पाठक, बच्छाव, महसूल सहाय्यक महेश गायकवाड, तुषार सोनवणे व ज्ञानेश्वर गोठे हेही सहभागी झाले. या कारवाई मुळे प्रवीण ढमाले यांनी केलेल्या या कारवाईचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!