Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुण्यात निवृत्त पोलिसावर तीक्ष्ण शस्त्राने वार … अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना आली समोर!

महाराष्ट्र 14 न्यूज : सेवानिवृत्त पोलिसावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास पुण्यातील शिवाजी रस्त्यावर घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी प्रकाश जयकुमार बुरले (वय-५८) यांनी खडक पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी प्रकाश बुरले यांच्या खिशातील मोबाइल हिसकावून नेला आहे. दरम्यान, बुरेल यांनी चोरट्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर चोरट्यांनी तीक्ष्ण शस्त्राने वार करून चोरट्यांनी पळ काढला. बुरले नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या ते स्वारगेट पोलीस वसाहतीत राहायला आहेत.

मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास बुरले शिवाजी रस्त्यावरून चालत निघाले होते. त्यावेळी घनश्याम लॉजजवळ दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी बुरले यांना धमकावले. त्यांचा मोबाइल हिसकावला. दरम्यान, बुरले यांनी चोरट्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी चोरट्यांनी बुरले यांच्या हातावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला. हा सर्व प्रकार रस्त्यावरील एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. चोरट्यांनी केलेल्या हल्ल्यात बुरले किरकोळ जखमी झाले आहेत. त्यानंतर चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. बुरले यांनी त्वरीत खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून पुढील तपास खडक पोलिस करत आहेत.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

49 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!