Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

Bhosri : महेंद्र सरवदे यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नगरसेविका सीमा सावळे आणि सारंग कामतेकर यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी!

महाराष्ट्र 14 न्यूज : भोसरी , बालाजीनगर येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते महेंद्र लक्ष्मण सरवदे यांच्यावर बुधवारी २६ ऑगस्ट रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी स्थायी समितीच्या माजी सभापती व नगरसेविका सीमा सावळे आणि सारंग कामतेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी बालाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात आले, तसेच गुन्हा दाखल करून अटक करावे, तसे न केल्यास त्यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही देण्यात आला.

यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुल डंबाळे , आरपीआय अल्पसंख्याक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष खाजाभाई शेख , बहुजन संघटकचे सर्वजीत बनसोडे , कष्टकरी पंचायत समितीचे अध्यक्ष बाबा कांबळे , लढा या संघटनेचे प्रमोद क्षीरसागर , सामाजिक कार्यकर्त्या अनिताताई सावळे , रिपब्लिकन युवा मोर्चाचे अजय लोंढे , संजीवन कांबळे , रिपाई ( आठवले गट ) अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष शेखलाल नदाफ , प्रभाग क्रमांक २० चे अध्यक्ष अक्षय दुनघाव , प्रभाग क्रमांक ४ चे अध्यक्ष संजय सरोदे व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Google Ad

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

108 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!