Google Ad
Editor Choice

कासारवाडी दत्त मंदिरात रंगला भक्तांचा मेळा … बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात, समाधान महाराज शर्मा यांच्या किर्तनाने आणले पाणी…

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ डिसेंबर) : पिंपरी चिंचवड कासारवाडी येथील श्रीदत्तसाई सेवा कुंज आश्रम मंदिरात, दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात येत आहे. पहाटे काकडारतीपासून सुरुवात होत गुरू चरित्र ग्रंथांचे पारायण, महिला भजनी मंडळाचे भजन, सायंकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन अशा धार्मिक व सांप्रदायिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने कासारवाडी- पिंपळे गुरव परिसरातील वातावरण धार्मिक आणि प्रसन्नतेने भारावले आहे.

आमदार ‘लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार’ आणि श्री दत्तसाई सेवा कुंज आश्रम द्वारा आयोजित हरिनाम कीर्तन सप्ताह दि.१२ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. हरिकीर्तन सप्ताहाच्या सहाव्या दिवशी हभप रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांचे एकनाथ महाराज यांच्यावरील रुपाने कीर्तनातून भाविकांना प्रबोधित केले. भाविकही त्याचा आनंदाने आस्वाद घेत होते.

Google Ad

यावेळी कीर्तनात ‘समाधान महाराज शर्मा’ म्हणाले, ही सर्व व्यवस्था पाहून मी भारावुन गेलो आहे. मंडप कसा असावा, टाळकरी कसे असावेत, औदुंबराच्या झाडाखाली दत्त गुरूंची मूर्ती कशी असावी, भंडारा डोंगरावर होणारे तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर कसे दिसेल, एका रात्रीत गोशाळा एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन सप्ताहाचे आयोजन कसे करावे, हे पाहण्यासाठी खरचं महाराष्ट्रातील किर्तनकारांनी येथे यावे असे ही व्यवस्था आहे, असे शर्मा महाराज म्हणाले.

यावेळी मा. आमदार विलास लांडे, मा.नगरसेवक शंकरशेठ जगताप, मा.नगरसेवक संजय नाना काटे, अतिश बारणे, बाळासाहेब वाघेरे, अण्णासाहेब कापसे, दत्ताभाऊ चिंचवडे, विनोद तापकीर, विठ्ठल भोईर , संदीप गाडे , संदीप नखाते,दत्ता पवळे , नगरसेवक सागर अंगोळकर, देवदत्त लांडे , विलास काटे, संजय भिसे, आप्पा बागल, निवेदक श्रीकांत चौगुले, बाळासाहेब काशीद, कैलास कातळे आणि मान्यवरांच्या उपस्थित हा भावभक्तीचा सोहळा पार पडला.

कीर्तन सोहळा :-

 

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!