Google Ad
Editor Choice Pune

Pune : पुण्याचे सह. आयुक्त डॉ . रवींद्र शिसवे यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर

महाराष्ट्र 14 न्यूज : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या राष्ट्रपती पोलीस पदकांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पदकांमधील महाराष्ट्रातील 57 पोलिसांनी ह्या राष्ट्रपती पोलीस पदकांवर मोहोर उमटवली आहे. विशेष बाब म्हणजे यामध्ये पुण्याचे सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचा देखील समावेश आहे. महाराष्ट्रातील ज्या 57 पोलिसांना राष्ट्रपती पोलिस पदक मिळाले आहेत त्यात 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक, राज्यातील 13 पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक तर राज्याला 40 पोलीस पदक मिळाले आहेत

तर, “महाराष्ट्राला इतरांच्या रक्षणासाठी धावून जाण्याची परंपरा आहे. या परंपरेत शौर्य आणि धैर्यासाठीचे मानाचे पदक पटकावून आपल्या बहाद्दरांनी महाराष्ट्राची प्रतिमा आणखी उंचावली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदक पटकाविणाऱ्या पोलीस अधिकारी- कर्मचारी, तसेच जीवन रक्षा आणि अग्निशमन सेवा पदक पटकाविणाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

Google Ad

Google Ad

About the author

Maharashtra14 News

30 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!