Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

माय-लेकरांचा खुनाने पुणे हादरले … मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिल्याच्या धक्कादायक प्रकाराने खळबळ 

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५जून) : माय-लेकरांचा खून करून मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. महिलेचा मृतदेह मंगळवारी पहाटे पुरंदर तालुक्यातील खळद गावच्या हद्दीत आढळून आला. तर, त्यांच्या सहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह नवीन कात्रज बोगदा परिसरात जांभुळवाडी येथे महामार्गाजवळील एका हॉटेलजवळ सायंकाळी आढळून आला आहे. याप्रकरणी सासवड आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात खुनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आयान शेख (वय 6) आणि त्याची आई आलिया आबिद शेख (वय 35) अशी खून झालेल्याची नावे आहेत. हे दोघेही धानोरी परिसरात राहण्यास होते. आलिया यांचा मृतदेह सासवड-जेजुरी रस्त्यावरील खळद येथे एका हॉटेलच्या समोर मंगळवारी सकाळी आढळून आला होता. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले की, खळदजवळ आढळून आलेल्या महिलेची ओळख सायंकाळी पटविण्यात आली. तिच्या गळ्यावर वार करुन खुन केल्याचे आढळून आले.

Google Ad

महिलेचा मृतदेह पहाटे आढळून आला होता. त्यानंतर तिचा फोटो व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर व्हायरल केला होता. माहिती मिळाल्यावर त्यांचे नातेवाईक मंगळवारी सायंकाळी पोलिस ठाण्यात आले होते. त्यांनी महिलेला ओळखले आहे. दोन दिवसापूर्वी संबंधित महिला पती व मुलाबरोबर मोटरीतून फिरायला गेले होते. तेव्हापासून त्यांचा पत्ता लागत नव्हता. मुलगा व आईचा खून करण्यात आला असून आलिया शेख हिच्या पतीचा अद्याप कोठेही पत्ता लागलेला नाही.
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले, जांभुळवाडी गावच्या हद्दीत महामार्गाच्या कडेला मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एका मुलाचा मृतदेह नागरिकांना आढळला.

त्यांनी तत्काळ त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यावेळी मुलाचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. मुलाचा शोध घेत त्याचे काही नातेवाईक आले होते. त्यामुळे त्याची ओळख पटविण्यात यश आले आहे. त्या खून कोणी व का केला हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, मुलाचा खून करून त्याठिकाणी मृतदेह टाकला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार भारती विद्यापीठ पोलिसांची पथके तपास करत आहेत. दोघांची मोटार पुणे सातारा रस्त्यावर आढळली असून महिलेच्या बेपत्ता पतीचा पोलीस शोध घेत आहेत.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

2 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!