Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

महाराष्ट्र 14 न्यूज चा दणका … वाल्हेकरवाडीमध्ये रुग्णालयाचा घातक कचरा उघड्यावर टाकल्या प्रकरणी खाजगी दवाखान्यास ठोकला ५० हजरांचा दंड!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५जून) : पिंपरी चिंचवड शहरात काही खाजगी रुग्णालयाकडून बायोमेडिकल कचरा थेट रस्त्यावर कचरा कुंडीच्या बाहेर टाकला जात असल्याने वाल्हेकरवाडी (चिंचवड) येथील चिंतामणी प्रवेशद्वार स्पाईनरोड परिसरातील नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला असल्याची बातमी सर्वप्रथम महाराष्ट्र 14 न्यूज ने दिली. सद्यस्थितीत महामारीच्या संकटात कोरोना संसर्गाचा मोठा धोका असतानाही खासगी दवाखाने, रुग्णालये बायोमेडिकल वेस्टेज राजरोसपणे थेट असे रस्त्याच्या कडेला टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरात घडत असल्याचे या बातमीने समोर आले.

तसेच या प्रकरणी स्थानिक माजी नगरसेवक राजेंद्र साळुंखे यांनी ही बाब महानगरपालिका आयुक्तांना तसेच आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली आणि मनपा प्रशासनाने आज या गोष्टीची दखल घेतल्याचे समोर आले.

Google Ad

हा सर्व कचरा उघड्यावरच टाकत असल्याने रुग्णांसाठी वापरण्यात आलेले इंजेक्शन्स, सलाईनच्या नळ्या, बाटल्या, हातमोजे, औषधांच्या बाटल्या हे सर्व वेस्टेज नागरिकांच्या आरोग्यास बाधा पोहोचवण्यास कारणीभूत ठरत असल्याचा धोका परिसरातील जागरूक नागरिकांकडून बोलून दाखवला जात आहे. हे वास्तव आम्ही प्रशासना समोर मांडल्याने आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरातील गुरुकृपा क्लिनिक या खाजगी दवाखान्यास महानगरपालिका आरोग्य विभागाने बायोमेडिकल कचरा उघड्यावर टाकल्या प्रकरणी रुपये पन्नास हजाराचा दंड ठोटावला आणि समज दिली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!