Google Ad
Editor Choice Pune

पुणेकरांचा श्वास आणखी थोडा मोकळा होणार … वाचा १४ जूनपासून काय सुरु , काय बंद ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ जून) : पुणेकरांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं घेतलाय. पुण्यात सोमवारपासून मोठी शिथिलता मिळणार आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नवी नियमावली जारी केली आहे.
नवीन नियमावलीनुसार पुण्यात संध्याकाळी 7 पर्यंत सर्व प्रकारची दुकाने सुरु राहणार असून मॉल, मल्टिप्लेक्स सिनेमागृह आणि थिएटर हे मात्र बंद असणार आहे.

शहरातील विकेंड लॉकडाऊन मात्र कायम ठेवण्यात आला आहे. शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहे. पुणे शहराचा पॉझिटिव्हिटी रेट हा 5.16 टक्के इतका असल्यामुळे पुणे शहराचा तिसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला होता. आणि या टप्प्यातील निर्बंधांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Google Ad

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

7 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!