Google Ad
Editor Choice Sports

🏋🏻‍♀️पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवीच्या ‘प्रतिक पवार’ ला … महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग 🏋️‍♂️चॅम्पियनशिपमध्ये ‘बेंच प्रेस’ प्रकारात ‘सुवर्णपदक’!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड मधील नवी सांगवीच्या ‘प्रतिक मधुकर पवार’ याने महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या चॅम्पियनशिपमध्ये ‘बेंचप्रेस’ प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. ०८ ते १० ऑक्टोबर दरम्यान औरंगाबाद येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यातील अनेक जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. पॉवरलिफ्टिंग एक शक्तीचा खेळ आहे तीन लिफ़्टन्सवर तीन वेळा प्रयत्न केले जातात: स्क्वाट, बेंच प्रेस, आणि डेडलिफ्ट. प्रतिक पवार ने १२० किलो वजनी गटात ‘बेंच प्रेस’ प्रकारात सुमारे १५० किलो वजन उचलून सुवर्णविक्रम केला.

त्याच्या या कामगिरी चे सांगवी-पिंपळे गुरव मध्ये सर्व स्थरातून कौतुक होत आहे, अनेकांनी त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या, प्रतिक हा यापूर्वी पॉवर लिफ्टिंगमध्ये आशियाई विजेता आहे. जागतिक पॉवर लिफ्टिंगमध्ये भाग घेऊन त्याने देशासाठी पदक आणण्याची त्याची जिद्द आहे.

Google Ad

यापूर्वी ही प्रतीक पवार ने स्टेट, नॅशनल, इंटर नॅशनल आणि आशिया स्पर्धेत उत्तम अशी कामगिरी करुन अनेक सुवर्ण पदक मिळविले आहेत. यापूर्वी ही पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक वाढविल्यामुळे त्याचा आमदार ‘लक्ष्मण जगताप’ आणि महापौर ‘माई ढोरे’ यांनी गौरव केला होता.

यावेळी बोलताना ‘प्रतिक पवार’ म्हणाला, … माझे वडिलांचे मार्गदर्शन यासाठी मला नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. आजही मी दररोज पिंपळे गुरव येथील ‘2N स्पोर्ट फिटनेस जिम‘ मध्ये दररोज सराव करत आहे, तेथील कोच मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. भविष्यात पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक जगाच्या नकाशावर वाढविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, आणि तेच माझे ध्येय असेल. तसेच महानगरपालिकेने शहरातील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देऊन शहराच्या लौकिकात भर पडण्यासाठी प्रयत्न करावेत, भारतीय खेळाडूंनी अशा स्पर्धामध्ये पुढे येण्याचे माझे ध्येय आहे, त्यासाठी मी तयारी करत आहे, असेही तो म्हणाला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!