Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मनपाची कोटीच्या कोटी उड्डाणे … विविध विकास कामांसाठी ३४ कोटी २४ लाख ७३ हजारांच्या खर्चास मंजुरी

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि . ७ ऑक्टोबर २०२० ) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणा – या ब , ह आणि फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील मलनि : सारण नलिका मॅनहोल चेंबर्मची साफसफाई आधुनिक यांत्रिकी पध्दतीने करण्यासाठी ३ कोटी ८७ लाख रुपये तर प्रभाग क्र १८ मधील डीपी रस्ते विकसित करण्यासाठी २ कोटी ९ ६ लाख रूपये खर्च केले जाणार आहेत . यासह विविध विकास कामांच्या सुमारे ३४ कोटी २४ लाख ७३ हजार रूपयांच्या खर्चास आज स्थायी समितीने मंजूरी दिली .

महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये स्थायी समितीची बैठक पार पडली . बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती संतोष लोंढे होते . सेक्टर क्रमांक २२ येथील जलशुध्दीकरण केंद्रामध्ये विविध युनिटसची स्ट्रक्चरल ऑडीट च्या अहवालानुसार देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे . यासाठी ३ कोटी ६० लाख रुपये खर्च होणार आहेत .

Google Ad

महापालिकेच्या अ , ब , ड , ग , ह क्षेत्रीय कार्यालयातील आणि देहू आळंदी रस्त्यामधील तसेच पुणे मुंबई हमरस्ता निगडी ते दापोडी दरम्यान मध्य दुभाजक सुशोभिकरण देखभालीसाठी ३ कोटी ७ ९ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत . तर डांगे चौक ते जगताप डेअरी येथील साई चौक या बीआरटी रस्त्याचे सुशोभिकरण देखभालीसाठी १८ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत . महापालिका क्षेत्रातील विविध उद्यानांच्या देखभाल व संरक्षणासाठी ३ कोटी ६४ लाख रुपये खर्च होणार आहेत . या खर्चासही बैठकीत मान्यता देण्यात आली .

महापालिकेच्या अ , ब , फ आणि ग प्रभागातील मैला शुध्दीकरण केंद्र तसेच मैला पाणी पंप हाऊसच्या इमारतीवर ५७ लाख रुपये खर्च करून सोलर सिस्टीम बसविण्यात येणार आहे . निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील क्लॅरीफॉक्यू लेटर ब्रिजची रोटेटिंग असेम्बली बदलण्यात येणार आहेत यासाठी ९ ६ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत . यासह सुमारे १८ कोटी रुपयांच्या प्रशासकीय खर्चास देखील बैठकीत मान्यता देण्यात आली .

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

14 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!