Google Ad
Celebrities Editor Choice Pune

Pune : प्रसिद्ध नृत्यांगना विशाखा काळेची आत्महत्या

महाराष्ट्र 14 न्यूज : अपघातामुळे आलेले व्यंग आणि परिस्थितीला कंटाळून पुण्यात लोककलावंत आणि नृत्यांगना असलेल्या विशाखा काळे ( वय २२ ) यांनी कल संध्याकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली . त्यांनी गर्जा महाराष्ट्र , महाराष्ट्राची गौरव गाथा महाराष्ट्राची लोकधारा यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमासह लावण्यांच्या कार्यक्रमातही काम केले होते .

पुण्यातील हडपसर परिसरात त्या राहण्यास होत्या . हडपसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल सायंकाळी तिचे आई वडील आणि बहीण काही कामानिमित्त बाहेर गेले होते . त्याच वेळेस विशाखाने गळफास घेऊन आत्महत्या केली . विशाखा काळे यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती . तिच्या बहिणीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार वर्षापूर्वी विशाखाचा अपघात झाला होता .

Google Ad

या अपघातामुळे तीच्या चेहर्यावर काही जखमा झाल्या होत्या . त्यामुळे मागील एक वर्षभरापासून नैराश्यात होती . त्यात लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे काही काम मिळत नव्हते . त्यामुळे नैराश्य वाढतच गेले आणि यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले . हडपसर पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात गुन्ह्याची नोंद केली आहे .

Tags
Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!