Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मनपाच्या बीआरटीएस च्या ठेकेदारांनी कोरोनाच्या संकटकाळात जपली सामाजिक बांधिलकी …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२१जून) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव चालु आहे. संभाव्य तिस-या लाटेचा विचार करता या महामारीचा मुकाबला करणेसाठी सर्व सामान्य रुग्णासाठी मदत म्हणुन बीआरटीएस विभागाचे सह शहर अभियंता यांनी म.न.पा. मध्ये विविध विकास कामे करण्या-या ठेकेदारांना त्यांचे सीएसआर (CSR) फंडातुन एक सामाजिक जबाबदारी म्हणुन मदत करणेस आवाहन केले होते.

त्यास प्रतिसाद देऊन मे.मातेरे इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. यांनी १० ली. क्षमतेचे १० ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर तसेच मे.अजवानी इन्फ्रा प्रा.लि. यांनी ५ ली. व १० मी. क्षमतेचे प्रत्येकी ५ ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर व मे.कृष्णाई कन्स्ट्रक्शन प्रा.लि. व मे.धनेश्वर कन्स्ट्रक्शन प्रा.लि. यांनी प्रत्येकी ५००पल्स ऑक्सीमीटर महापालिकेस मा.आयुक्त श्री.राजेश पाटील यांच्याकडे सपुर्त केले. या प्रसंगी मातेरे क्न्स्ट्रक्शन तर्फे श्री.मातेरे, अजवानी इन्फ्रा तर्फे श्री.सुनिल अजवानी, कृष्णाई क्न्स्ट्रक्शन तर्फे श्री.करण भोसले व धनेश्वर कन्स्ट्रक्शन तर्फे श्री.संजय गावडे तसेच बीआरटीएस विभागाचे सह शहर अभियंता श्री.श्रीकांत सवणे उपस्थितीत होते.

Google Ad

कोविड-१९ या महामारीच्या संकटकाळात ऑक्सीजन बेडची कमी असताना ऑक्सीजन कॉन्सेट्रेटर हा एक उत्तम पर्याय होता व त्याची मोठी कमतरता होती. परिस्थिती ओळखुन सामाजिक दायित्वाच्या भावनेतुन केलेल्या मदतीबाबत मा.आयुक्त श्री.राजेश पाटील यांनी मनपा मार्फत संबंधितांचे आभार मानले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!