महाराष्ट्र 14 न्यूज, (दि .२१ जून २०२१) : उद्या दि .२२ जून २०२१ रोजी ‘ कोविशिल्ड ‘ चा वय ३० ते ४४ वर्षे वयोगटामधील लाभार्थीना फक्त पहिला डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या खालील कोविड -१९ लसीकरण केंद्रावर सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल .
सदर वय वर्षे ३० ते ४४ वयोगटामधील कोविन अॅपवर नोंदणी करुन स्लॉट बुकींग केलेल्या ५० टक्के व ऑन द स्पॉट उपस्थित असणा – या ५० टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल .
तसेच उद्या दि .२२ / ०६ / २०२१ रोजी फक्त वय ४५ वर्षा पेक्षा जास्त वयोगटामधील लाभार्थ्यांना आणि HCW व FLW यांना ‘ कोविशिल्ड ‘ चा पहिला डोस व दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर १२ ते १६ आठवडयांच्या दरम्यान म्हणजे ( ८४ दिवसानंतर ते ११२ दिवसपर्यत ) देण्यात येणार आहे . या अनुषंगाने लसीकरणाचा डोस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सोबत जोडलेल्या यादीमधील १८ लसीकरण केंद्रावर १०० लाभार्थीच्या क्षमतेने सकाळी १०.०० ते सायं . ५.०० या कालावधीत देण्यात येईल . पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर दि .२२ / ०६ / २०२१ रोजी सकाळी ९ .०० वाजले नंतर टोकन वाटप करण्यात येईल नागरिकांनी वेळेआधी लसीकरण केंद्रावर गर्दी करु नये .
58 Comments