Google Ad
Editor Choice Health & Fitness

‘प्रशांत शितोळे’ यांनी जपली सामाजिक बांधिलकी … पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या “चला एक जीव वाचवू या, रक्तदान-प्लाझ्मादान करूया” मोहिमेत ५५१ जणांनी केले रक्तदान!

महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पार्थ पवार फाऊंडेशन च्या सहकार्यातून … नवी सांगवी- सांगवी, पिंपळेगुरव यांच्या वतीने भव्य अशा रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. खरं पहिलं तर रक्ताला जात-पात, धर्म, आणि आजकाल चाललेलं पक्षीय राजकारण याचा काहीही संबंध नसतो, कारण कोणावर केव्हा कोणती वेळ येईल आणि वेळेला कोण उपयोगी पडेल हे तुम्ही आम्ही कोणीही सांगू शकत नाही, त्यामुळे या संकटात सर्वांनी एकत्र येऊन सेवा कार्य करण्याची गरज आहे, तर आणि तरच देशावर, राज्यावर आणि आपल्या वर आलेल्या संकटास आपण ध्येर्याने तोंड देऊ शकू …

ही गरज ओळखूनच कोरोना संसर्गाच्या संकटकाळात
कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांना वरदान ठरणाऱ्या प्लाझ्माची गरज भागविण्यासाठी या भव्य रक्तदान व प्लाझ्मादान शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक १ मे रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत नवी सांगवीतील साई चौक येथील संस्कृती लॉन्स येथे कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून करण्यात आले.

Google Ad

शिबिराचे मुख्य आयोजक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्या हस्ते सकाळी ठीक ९ वाजता शिबिरास प्रारंभ झाला. यावेळी वेळेअगोदरच तरुण रक्तदाते उपस्थित असल्याचे दिसून आले. यावेळी शिबिरात येणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याचा २ लाख रूपयांचा अपघाती विमा उतरविण्यात आला असून त्याच बरोबर प्रत्येक रक्तदात्यास सॅनिटायझर व मास्क भेट देण्यात देण्यात आले .

🩸‘चला एक जीव वाचवूया’ … ‘रक्तदान व प्लाझ्मादान करूया’ … या मोहिमेत तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग!

रक्तदानाची व प्लाझ्मा दानाची गरज आजच्या या संकटात अधिक व्यापक प्रमाणत असल्याने, प्लाझ्मादान कोरोनाच्या संकटात रुग्णांना वरदान ठरत असल्याचे, कोरोनाच्या या पार्श्वभूमीव आम्ही प्लाझ्मादान करणेबाबत नागरिकांना विशेषतः युवाकांना आयोजक प्रशांत शितोळे यांनी भावनिक आवाहन केले होते, या आवहानास इतका प्रतिसाद मिळाला की सकाळी ११ वाजेपर्यंत १२५ रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले, होते यात अनेक महिलांचाही सहभाग दिसून आला, तर काहींनी सहकुटुंब रक्तदान केले.

कोरोनाच्या संकट काळात रुग्णांना जीवनदान देण्याकरिता या शिबिराचे आयोजन केले असल्याचे यावेळी आयोजक ‘प्रशांत शितोळे’ यांनी सांगितले. यावेळी बोलताना ते म्हणाले की “आज सकाळीच पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शहरात असूनही तरुणांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि प्रेमामुळे मी त्यांच्या दौऱ्यास उपस्थित राहू शकलो नाही, कारण अजितदादांनीच सांगितले की, आपणांस नागरिकांचा आपल्या जनतेचा जीव महत्त्वाचा आहे.

या शिबिरात ५५१ रक्तदात्यांनी आपले रक्तदानाचे पवित्र कर्तव्य बजावले. तर २५ दात्यांचे प्लाझ्मा  रक्त तपासणी साठी पाठविले आहेत. अक्षय ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले, यात शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट , पार्थ पवार फाऊंडेशन , सिझन ग्रुप सोशेल वेल्फेअर ट्रस्ट , सुवर्णयुग प्रतिष्ठान , शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, रणझुंजार मित्र मंडळ , समर्पण युवा ट्रस्ट, ओमसाई ट्रस्ट, युवाशक्ती ट्रस्ट , आई प्रतिष्ठान, जगदंब युवा प्रतिष्ठान या संस्थांचे शिबिरासाठी विशेष सहकार्य लाभल्याचे दिसून आले.

या शिबिरास राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, नगरसेवक मयूर कलाटे, विक्रांत लांडे पंकज भालेकर यांनी भेट दिली व रक्तदात्यांचे कौतुक केले.

यावेळी आयोजक प्रशांत शितोळे आणि सौ. शीतल शितोळे तसेच शिवाजी पाडुळे, नगरसेवक नवनाथ जगताप, तानाजी जवळकर, राजेंद्र जगताप, निखिल चव्हाण, शाम जगताप, बाळासाहेब पिल्लेवार, पंकज कांबळे, राजेंद्र तनपुरे, सुनील ढोरे, महेश माने, साहेबराव तुपे, मोहन कंबळे, महेश भागवत, संजय यादव उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!