Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त कोरोनाच्या संकट काळात … अरुण पवार यांच्या माध्यमातून मराठवाडा जनविकास संघाचा गरजूंना मदतीचा हात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे! …
स्वामी समर्थांची ही साद फार बोलकी आहे. याच प्रेरणेतून जनसेवक मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांच्या प्रयत्नातून कोरोनाच्या महामारीमुळे झालेल्या टाळेबंदीत उपासमार होऊन, हातावर पोट असलेल्या गरजू कष्टकरी कुटुंबांना मोफत किराणा किटचे वाटप करण्यात आले.

कोरोनाने पुन्हा एकदा उग्र रूप धारण केले. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सरकारने टाळाबंदीचा निर्णय घेतला आहे. या टाळेबंदीचा नियम पाळत असताना मात्र अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. जनतेची सेवा करणारे जनसेवक अरुण पवार हे व्यतीत झाले. अण्… फुल ना फुलाची पाकळी का होईना, परंतु सामाजिक भावनेतून आपण या कष्टकऱ्यांना काहीतरी मदत केली पाहिजे, हि खूणगाठ मनाशी बांधली.

Google Ad

शनिवार दिनांक १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगारदिनाचे औचित्य साधत त्या कामगारांना मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून किराणा किटचे वाटप करण्यात आले. आपला खारीचा वाटा उचलताना… पिंपरी-चिंचवड शहरातील कष्टकरी गरजू कामगार बांधवांना व अपंग बांधवांना १३० किट त्यामध्ये गहू, तांदूळ, साखर, तेल, मीठ, शेंगदाणे , पोहे असे १५ दिवस पुरेल एवढे अन्नधान्य, किराणा किटचे वाटप करण्यात आले. हे साहित्य पिंपळे गुरव याठिकाणी मराठवाडा जनसेवक संघाच्या कार्यालयात कोरोना संबंधीचे सर्व नियम व सोशल डीस्टंन्सिंग ठेवून सानिटायझर, मास्क देवून करण्यात आले.

सदर कार्यक्रमात बोलताना संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी अनेक संस्था आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी अशा कार्यक्रमांचे आयोजन करून व आपल्या कष्टकरी बांधवांना मदतीचा हात पुढे करतील अशी अपेक्षाही व्यक्त केली. यावेळी सामाजप्रबोधनकार शारदाताई मुंडे, सामाजिक कार्यकर्ते किशोर अटरगेकर, सामाजिक कार्यकर्ते मोहनपाल, सामाजिक कार्यकर्ते हरी सरडे संघाचे पदाधिकारी आणि मित्र परिवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

36 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!