Google Ad
Editor Choice

पिंपळे गुरवच्या ‘कावेरी जगताप’ यांनी सामाजिक बांधिलकी जपत, बचत गटाच्या माध्यमातून … केली सफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२०ऑक्टोबर) : पिंपरी चिंचवड येथील पिंपळे गुरव-नवी सांगवी येथे दिवाळी सण निमित्ताने सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना गरीब व गरजूंचाही सण उत्साहात साजरा होण्यासाठी ‘मुक्तांगण महिला गृहउद्योग’ संस्थेच्या माध्यमातून बचत गटातील महिलांनी एकत्र येत दिवाळीचे फराळ स्वतः तयार करून परिसरातील आरोग्य विभागात काम करणाऱ्या महानगरपालिका कर्मचारी पुरुष व महिलांना वाटून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरविला.

कोरोना काळात आरोग्य सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वतःची तसेच कुटुंबाची काळजी न करता रात्रंदिवस नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याला महत्त्व दिले, अशा गोरगरीब कुटुंबाची दिवाळी अंधारात जाऊ नये म्हणून त्यांच्या घरातही दिवाळीच्या दिव्यांचा प्रकाश यावा या करीता पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे गुरव येथील ‘मुक्तांगण महिला गृहउद्योग’ संस्थेच्या वतीने अध्यक्षा ‘कावेरी संजय जगताप’ यांनी पिंपळे गुरव परिसरातील साफसफाई करणाऱ्या पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना स्वतः बनविलेल्या दिवाळी फराळाचे वाटप करून कामगारांच्या जीवनात प्रकाश फुलविला, यामुळे कामगार महिलांची दिवाळी गोड झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. याप्रकारे अनेक सेवाभावी उपक्रम मुक्तांगण महिला गृहउद्योग संस्थेच्या माध्यमातून या परिसरात राबविले गेले आहेत.

Google Ad

यावेळी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा ‘कावेरी जगताप’ म्हणाल्या ” आपण राहत असलेल्या परिसराची दैनंदिन स्वच्छता करण्याचे काम या महिला करत असतात. त्यांनी कोरोनाच्या या महाभयंकर संकट काळात आपला जीव धोक्यात घालून स्वतःच्या कुटूंबाची पर्वा न करता या कामगारांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली, आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपल्या घासातील एक घास देऊन आपल्या कामगार बंधू भगिनींची दिवाळी गोड केली पाहिजे, त्यांच्या जीवनात प्रकाश फुलवणे हे आपले नागरिक म्हणून कर्तव्य आणि जबाबदारी आहे.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ.कावेरी जगताप, निर्मला नवले, मनीषा काटे, निमा बाईत, कस्तुरी कोलते, कविता दळवी शोभाताई आहेर रोहिनी कोळपे महिलांच्या हस्ते दिवाळी फराळ वाटप करण्यात आला. या प्रसंगी श्रीगणेश सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय जगताप परिसरातील नागरिक व इतर मान्यवर उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!