Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपळे गुरव, नवी सांगवी मधील बेवारस वाहनांना मालक कोण ? तर अनेक ठिकाणी रस्त्यावरील सिमेंट ब्लॉकचा ढीग ठरतोय अडथळा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४ मे) : पिंपरी चिंचवड मनपाने शहरातील रस्ते डांबराऐवजी सिमेंटने बांधले असून, वाहतुकीस अनेक ठिकाणी मोठेही केले आहे; परंतु अनेक ठिकाणी रस्त्यावर चारचाकी वाहने अनेक दिवस धूळखात पडून आहेत, या वाहनांमुळे रस्ते मोठे करूनही वाहतुकीस अडथळा निर्माण केला जात आहे. याकडे मनपा तसेच वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पदपथांचा दुरुपयोग सातत्याने होत आहे.

लॉकडाऊनमुळे रहदारी बंद असली तरी दवाखान्यासमोरील अथवा मेडिकल दुकानासमोर पदपथ असतानादेखील त्याचा वापर होताना दिसत नाही. पिंपळे गुरव भागात नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यावरच अनेक ठिकाणी वाहनाची पार्किंग आणि मनपाच्या वतीने होणाऱ्या कामासाठी आणलेले सिमेंट चे ब्लॉक हे काम होऊनही अनेक दिवस तिथेच पडलेले असल्याने अपघातास निमंत्रण दिले जात आहे. तसेच सिमेंट रस्त्याच्या बाजूला असलेला पदपथ अतिक्रमणाच्या विळख्यात जाण्याची भीती दक्ष नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Google Ad

कोविडमुळे रुग्णांची ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिकांनादेखील अडथळ्याला तोंड द्यावे लागत आहे. मनपा व वाहतूक शाखेच्यावतीने लक्ष देऊन वाहनांवर कारवाई करावी, तसेच पावसाळ्यापूर्वी सर्वठिकानचा राडारोडा उचलून रस्ता वाहतुकीयोग्य करावा, अशी मागणी नवी सांगवी, पिंपळे गुरव मधील नागरिकांकडून होत आहे.

यासोबतच रस्त्याकडेला असलेल्या बेवारस वाहनांचा प्रश्नही निर्माण झाला आहे. भंगार वाहने शहरातील नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. जास्त वेळ रस्त्यावरच थांबलेल्या वाहनांना महानगरपालिकेमार्फत नोटीस देण्याची गरज आहे. अशी वाहने तत्काळ न हटविल्यास दंड आकारून कारवाई करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून अशी अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक पिंपळे गुरव, नवी सांगवीकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

118 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!