Google Ad
Editor Choice Maharashtra

Pandharpur : अजित पवारांचा पंढरपूर दौरा, कोरोना नियमांचे तीन तेरा … राष्ट्रवादीच्या आयोजकांवर गुन्हा दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज : पंढरपूर पोटनिवडणुकीचा राष्ट्रवादी उमेदवार ठरवण्यासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या श्रीयश पॅलेस येथे झालेल्या कार्यक्रमाला कोरोनाचे नियम डावलून शेकडोंनी गर्दी जमा झाली होती. अखेर कोरोना नियमांचे पालन न झाल्याने या कार्यक्रमाचे आयोजकांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वास्तविक अजित पवार यांनी पहिल्या टप्प्यात पंढरपूर व मंगळवेढा या भागातील विविध शिष्टमंडळाची भेट घेताना प्रत्येक शिष्टमंडळात 20 सदस्य बंधनकारक केले होते. मात्र कार्यालयाबाहेर खूप मोठ्या संख्येने जमा झालेले राष्ट्रवादी समर्थक या कार्यालयात घुसल्यानंतर येथे हे सभा झाली.

Google Ad

ज्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अजित पवार यांनी या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र हे होत असताना कोरोनाचे सर्व नियम डावलण्यात आल्याने निवडणुकीसाठी नेमलेल्या छायाचित्रीकरण पथक प्रमुख मिघाराज कोरे यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदीप मांडावे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे डीवायएसपी विक्रम कदम यांनी सांगितले. ही पोटनिवडणूक 13 एप्रिल रोजी होत असून 23 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

150 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!