Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड मधील YCM हॉस्पीटलमध्ये कोरोनाचा धोका वाढला … 15 डॉक्टरांसह 10 नर्सला ‘ कोरोना’ची लागण

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण मेमोरियल रुग्णालयातील (वायसीएमएच) कोरोनाचा ‘सामना’ करणारे 15 डॉक्टर आणि 10 परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे काही ठिकाणी संचारबंदीसह लॉकडाऊन केला आहे. अशातच महापालिकेच्या YCM रुग्णालयात एकाचवेळी 15 डॉक्टर आणि 10 नर्स अशा एकूण 25 कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली. ज्या कर्मचाऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली ते कोविडच्या वॉर्डमधील रुग्णांना सांभाळत होते. कोरोनाबाधित आढळेलेले सर्वच डॉक्टर आणि नर्स हे खुप काळजी घेत होते मात्र त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

Google Ad

डॉ. यशवंत इंगळे म्हणाले की, कोरोनाबाधित आढळलेल्या कर्मचा-यापैकी आतापर्यंत 5 पाच जणांना डिस्चार्ज दिला असून त्यांना होम क्वारंटाइनच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर अन्य रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोविड विभागातील डॉ. प्रवीण सोनी म्हणाले की, रुग्णालयातील काही डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे.

त्यामुळे आता रुग्णालय हे फक्त कोविड रुग्णांसाठीच जाहीर करावे. दरम्यान रुग्णालयात 210 बेड्स हे फक्त कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवले आहेत. तर अन्य पूर्णपणे भरले आहेत. तसेच 45 आयसीयू बेड्ससुद्धा रिकामे नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!