Google Ad
Editor Choice

सांगवी येथे विजयादशमीच्या मुहूर्तावर … ‘अखिल सांगवी जेष्ठ नागरिक संघा’ची स्थापना!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ ऑक्टोबर) : अखिल सांगवी ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना विजयादशमीच्या मुहूर्तावर (दि.१५ ऑक्टोबर) रोजी संस्थापक कृष्णराव ऊर्फ तात्यासाहेब शितोळे व प्रशांत शितोळे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड यांच्या प्रेरणेने सांगवी येथे करण्यात आली.

जेष्ठ नागरिकांना एकत्र येता यावे, या वयात त्यांना विरंगुळा मिळावा, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे ज्येष्ठांनी घराबाहेर पडणे टाळले होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक वेगळ्याच मानसिक अवस्थेत होते. त्यांचा विरंगुळा व मनावरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने  ज्येष्ठांना दु:खाचा विसर पडून सुख अनुभवता यावे. याकरिता या संघाची स्थापना करण्यात आल्याचे ‘प्रशांत शितोळे’ यांनी सांगितले.

Google Ad

यावेळी प्रमुख पाहूणे व वक्ते म्हणून प्रषित गायकवाड (यशदा पुणे) तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संजोग वाघिरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पिंपरी-चिंचवड, जलसंधारण चळवळीतील निंबाळकर सर, गरुडसर, कुमार ढोरे, बबनराव शितोळे, विश्वनाथ शिंदे तसेच विविध जेष्ठ नागरिकसंस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक व स्वागत बाबासाहेब ढमाले यांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

206 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!