Google Ad
Editor Choice

समाजसेवा करणे हेच खरे मंडळाचे काम आहे – शिवाजी माने ‘समाज सेवा हीच ईश्वर सेवा’ … मानत सातारा मित्र मंडळाचे सेवा कार्य !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ऑक्टोबर) : समाजाची सेवा करणे हेच खरे मंडळाचे काम आहे. हाच वसा घेऊन पिंपरी चिंचवड मधील सांगवी येथील ‘सातारा मित्र मंडळ’ गेली चार वर्षे समाजातील गोरगरिबांना, वंचितांना सढळ हाताने मदत करत आहे असे मत सातारा मित्र मंडळांच्या चौथ्या दसरा मेळाव्यात बोलताना मंडळाचे अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी व्यक्त केले.

कोरोनाचा काळ असतानाही मंडळाच्या वतीने या वर्षी निगडी येथील शंभर तृतीपंथी लोकांना दोन महीने पुरेल एवढे धान्याचे किट वाटप केले. दापोडीतील सरस्वती अश्रमास पंचवीस हजार रुपयाचे धान्य घेऊन दिले, उंब्रज पोलीस स्टेशन सातारा येथे पाचशे बाटल्या गुळवेल काढा, कोपर्डे हवेली संपुर्ण गावाला दीड हजार बाटल्या गुळवेल काढा, वाटप केले. फक्त पुण्यात नाहीं तर ठोमसे ता पाटण गावात शंभर धान्य किट वाटप केलं. त्याचबरोबीने चिपळूण कोयना पूरग्रस्तांना नगरसेवक शशीकांत आप्पा कदम यांच्या मदतीने एक हजार धान्य किट वाटप व एक ब्लँकेट व चटई जवळ जवळ पंधरा लाख रुपयाचे धान्य वाटप केलं.

Google Ad

तसेच मुक्तिधाम गोशाळा या गोशाळेला एक लाख रुपयाची मदत केली . मंडळाचे ब्रीद वाक्यच समाज सेवा हीच ईश्वर सेवा या ब्रीद वाक्याप्रमानेच मंडळ गेले चार वर्षे काम करतं आहे. हे सर्व कार्य करतांना सर्व सातारकर एकजुटीने काम करीत आहे याचा अध्यक्ष म्हणून मला खुप अभिमान आहे. या चार वर्षाच्या कालावधीत अनेक समाजोपयोगी उपक्रम मंडळांने राबविले आहेत. याची दखल अनेकांनी घेईन आपल्या कार्याबद्दल गुणगौरव ही केला आहे. आज मंडळाचे चार व्हॉट्स ॲप ग्रुप, एक फेस बुक ग्रुप व यु ट्यूब चॅनेल आहे. आपल्या मंडळाच्या सर्व कार्यक्रमाची माहिती यावर पाहायला मिळते. आपण सर्व जन पुढेही असेच कार्य करतं राहू व सर्व सातारकरांची अशीच साथ मला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो व सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो.

यावेळी मंडळाच्या दफ्तराचे पूजन करण्यात आले याप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष संजय चव्हाण, खजिनदार सोमनाथ कोरे, संचालक विरेंद्र गायकवाड, विश्वास शिंदे, जावेद फारस, विजय शिंदे, व सर्व सातारकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ कोरे व आभार संजय चव्हाण यांनी केले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

5 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!