Google Ad
Editor Choice

जुनी सांगवीत श्री संत गजानन महाराज मंदिरात प्रकटदिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र १४ न्यूज, (दि. २३ फेब्रुारी) : श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त सांगवी परिसरातील भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसर गर्दीने अगदी फुलून गेला होता . श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त येथील श्री संत गजानन महाराज मंदिर सर्व न्यासाच्या वतीने पहाटेपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .

संपूर्ण मंदिरास आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे . याचबरोबर मंदिर अंतर्गत भागात फुलांची सजावट , रांगोळी सजावट करण्यात आल्याने मंदिर परिसराचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते . सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते . सकाळी अध्यक्ष शरद ढोरे व अनिता ढोरे यांच्या वतीने महापूजा करण्यात आली .

Google Ad

महापुजेनंतर विजयग्रंथाचे पारायण करण्यात आले यात दोनशेच्या वर भाविकांनी पारायण केले . पारायणकर्ते विद्याधर जोशी यांनी व्यासपीठ नेतृत्व केले . महापौर उषा ढोरे व सांगवी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील टोणपे , माजी नगरसेवक प्रशांत शितोळे , विजय जगताप , शारदा सोनवणे, न्यासाचे अध्यक्ष शरद ढोरे , जवाहर ढोरे आदी मान्यवरांच्या हस्ते सामुहिक आरती करण्यात आली . शासकीय नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्यात येत असल्याचे मंदिर समितीकडून सांगण्यात आले .

या बाबत परिसरात सॅनिटायझर , भाविकांची गर्दी टाळण्यासाठी प्रसादासाठी लावलेल्या रांगा यांचे नियोजन करण्यात आले होते . भक्तगणांच्या दर्शन व महाप्रसादासाठी लागलेल्या रांगा व गण गण गणात बोते या जयघोषाने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते . उन्हातही भाविकांनी दर्शन व महाप्रसादासाठी मैदानावर रांगा लावल्याचे यावेळी दिसून आले .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!