Google Ad
Editor Choice Maharashtra crimes

निगडी पोलीस ठाणे हद्दितील सराईत गुन्हेगार … प्रशांत रमेश कोळी याचे टोळीवर मोका अंतर्गत कारवाई!

महाराष्ट्र 14 न्यूज : गणेश जवादवाड , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , निगडी पोलीस ठाणे यांनी मंचक इप्पर , पोलीस उप – आयुक्त , परिमंडळ -१ यांचे मार्फतीने निगडी पोलीस ठाणे येथे तपासामध्ये प्रशांत रमेश कोळी , वय -३२ वर्षे , रा . मिलींदनगर , ओटास्किम , निगडी , पुणे , ( टोळी प्रमुख ) तसेच सुरज सुभाष पवार , वय -२८ वर्षे , रा . बि.नं. १४/१७ , राजहंस सोसायटी , ओटास्किम , निगडी , पुणे , राहुल यलप्पा कांबळे , वय -२५ वर्षे , रा . राहुलनगर , ओटास्किम , निगडी , पुणे , अतुल ऊर्फ बबन भाऊसाहेब घावटे , वय -३१ वर्षे , रा . शेळकेवाडी , राजापूर , श्रीगोंदा , अहमदनगर . यांचेविरूध्द खुन , खुनाचा प्रयत्न , गंभीर दुखापत करणे , दरोडा टाकुन खुन करणे , दरोडा , पुरावा नष्ट करणे , जबरी चोरी करुन दुखापत करणे , जबरी चोरी करणे , अपहरण करणे , व बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे त्याची विक्री करणे , असे एकुण १९ गंभीर गुन्हे पिंपरी चिंचवड शहर , पुणे शहर , पुणे ग्रामीण व अहमदनगर जिल्हा याठिकाणी दाखल आहेत .

हे सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचे विरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियत सन १९९९ अंतर्गत कारवाई करणे बाबत प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचेकडे पाठविला होता. सुधीर हिरेमठ , पोलीस उप – आयुक्त , गुन्हे , व श्रीमती . प्रेरणा कट्टे , सहायक पोलीस आयुक्त , गुन्हे -२ , पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्रसिंह गौर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , पी.सी.बी. गुन्हे शाखा , पिंपरी चिंचवड यांनी सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करून त्रुटींची पूर्तता करून सदरचा प्रस्ताव आदेश पारीत करणे कामी अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांचेकडे पाठविला, त्यांनी दिनांक २२/०१/२०२१ रोजी रामनाथ पोकळे , अपर पोलीस आयुक्त , पिंपरी चिंचवड यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १ ९९९ चे कलम ३ ( १ ) ( ii ) , ३ ( ४ ) या कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश पारीत केलेले आहेत .

Google Ad

सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त , कृष्ण प्रकाश साो , अपर पोलीस आयुक्त, रामनाथ पोकळे, सुधीर हिरेमठ पोलीस उप – आयुक्त , गुन्हे , मंचक इप्पर पोलीस उप – आयुक्त परिमंडळ -१ , श्रीमती . प्रेरणा कट्टे , सहायक पोलीस आयुक्त , गुन्हे -२ , यांचे मार्गदर्शनाखाली , राजेंद्रसिंह गौर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , पी.सी.बी. गुन्हे शाखा , गणेश जवादवाड , वरिष्ठ पोलीस निरीक्षक , एल . एन . सोनवणे , सहायक पोलीस निरीक्षक , निगडी पोलीस ठाणे तसेच अंमलदार पोलीस हवालदार सचिन चव्हाण , पी.सी.बी. गुन्हे शाखा , व पो.ना. संदिप दानवे , पो.ना. निलेश चासकर , निगडी पोलीस ठाणे , यांचे पथकाने केली आहे .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

57 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!