Google Ad
Editor Choice

Newziland : या देशामध्ये १०० दिवसांत एकाही कोरोना रूग्णाची नोंद नाही ; महिला पंतप्रधानाची कमाल !

महाराष्ट्र 14 न्यूज : जगभरातील कोरोनाचा विळखा दिवसागणिक वाढत चालला आहे. कोरोना बाधितांचा आकडाही छातीत धडकी भरवणारा आहे. अमेरिका, चीन आणि रशियासारख्या महासत्तांनी देखील या व्हायरससमोर लोळण घेतली आहे. मात्र न्यूझीलंड या देशानं यादरम्यान कमाल करून दाखवली आहे. मागील १०० दिवसात एकही कोरोना रूग्ण आढळून न आल्यानं आता न्युझीलंडवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

विशेष बाब म्हणजे पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांच्या नेतृत्वामुळे कोरोनावर मात करणं शक्य झाल्याचं आता बोललं जात आहे. जॅसिंडा यांनी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कडक लाॅकडाऊनचे आदेश लागू केले होते. यावेळेस देशातील कोरोना बाधीतांचा आकडा केवळ १०० इतका होता.

Google Ad

या कडक लाॅकडाऊनचा परिणाम म्हणजे मागील ३ महिन्यांच्या काळात न्यूझीलंडमधील एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली नाही. मात्र परदेशातून आलेल्या नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याचं निष्पन्न होताच त्यांना सीमेवरच क्वारंटाईन करण्याचा निर्णय जॅसिंडा यांनी घेतला आहे.दरम्यान उत्तम राजकीय नेतृत्व मिळाल्यानं आणि त्याला विज्ञानाची उत्तम जोड दिल्यानं न्युझीलंडला कोरोनावर मात करता आल्याचं मत युनिवर्सिटी ऑफ ओटॅगो येथील प्रोफेसर माइकल बेकर यांनी व्यक्त केलं आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!