Google Ad
Editor Choice Pune District

Junner : पुणे जिल्ह्यामध्ये वाळू माफियांच्या टोळीकडून दोन पत्रकारांवर खुनी हल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज : वडगाव शिंदे येथील घोड नदीच्या पदमावत मदिरा जवळील नदी पात्रात वाळू उपसाची शूटिंग करण्यासाठी गेलेल्या दोन पत्रकारांवर वाळू माफियांच्या टोळीने खुनी हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री साडेसहा ते सातच्या दरम्यान घडली आहे. प्रफुल्ल मोरे व संतोष सावंत अशी गंभीर जखमी झालेल्या पत्रकारांची नावे असून त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, दोघांच्याही पाठीवर मारहाणीचे वळ आहेत. या वाळू माफियांनी त्यांना लाथाबुक्या लोखंडी गज व काट्याने मारहाण केली असून, सात ते आठ जण तिथे होते, अशी माहिती समोर आली आहे. दोघांचे कपडे रक्ताने माखलेले असून सावंत यांच्या डाव्या पायला गंभीर जखम झाली आहे.

Google Ad

खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांनी दोन पोलिस पथकाद्वारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू केले असून दोन वाळू माफियांना पोलिसांनी गजाआड केले आहे. आंबेगाव जुन्नर विभागाच्या प्रांत अधिकारी रमा जोशी पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन द पत्रकारांची भेट घेतली. जोशी व पोलीस पथक घटनास्थळी गेले आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. आंबेगाव तालुका पत्रकार संघाने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता आंबेगाव, खेड जुन्नर तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी ची बैठक मंचरला होणार आहे. तेथेच आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल पत्रकार संघाकडून सांगण्यात आले, पुणे पिंपरी चिंचवड मधील सर्व पत्रकार संघटनेतर्फे जाहीर निषेध!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!