Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

नवी सांगवीतील साई चौक येथे ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे’ यांची जयंती साजरी!

महाराष्ट्र 14 न्यूज : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची शताब्दी महोत्सव जयंती डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती सांगवी नवी सांगवी पिंपळे गुरव यांच्या माध्यमातून साई चौक येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली या कार्यक्रम प्रसंगी सांगवी पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजय भोसले यांच्या हस्ते अण्णाभाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मातंग आघाडीचे भिसे, थोरात, युगप्रवर्तक संघाचे सचिव हरीश गायकवाड, हे यांनी आपले अण्णा भाऊ साठे यांच्याविषयी आपले विचार मांडले, संयुक्त जयंती महोत्सव यांचे कार्याध्यक्ष रवींद्र पारदे सर, राहुल काकडे, यांनी प्रस्तावना केली व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काकडे यांनी केले. लुंबिनी बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष मोहन कांबळे यांनीही आपले विचार मांडले तसेच या कार्यक्रमला अमरसिंग आदियाल, सुरेश सकट, रवी सगट, विजय देवरे,माजी सचिव अँड नितनवरे, श्रीकांत सगट, विजय चौधरी, बाळासाहेब पिल्लेवार, विलास थोरात, बदाम कांबळे , विनोद गायकवाड, रोहित करके, गजानन कांबळे उपस्थित होते, यानंतर अमरसिंग आदियाल यांनी सर्वांचे आभार मानले.

Google Ad

आपल्या पोवाड्यातून त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम मना-मनात पोहचवला.आपल्या श्रेष्ठ साहित्यकृतीतून मराठी आणि महाराष्ट्राची वैशिष्ट्ये जगभरात पोहचवली. अण्णाभाऊंचे हे योगदान कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी असेच आहे. अशा महान साहित्यरत्न अण्णाभाऊंना जयंती निमित्त विनम्र अभिवादन

Google Ad

About the author

Maharashtra14 News

89 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!