Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : सणासुदीच्या काळात पुसले बळीराजाच्या डोळ्यातील अश्रू … उद्धव ठाकरेंनी केलं शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर!

महाराष्ट्र 14 न्यूज: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अतिवृष्टीग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. ही मदत तातडीने वितरित करण्यात येणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर आणि अतिवृष्टीग्रस्तांना मदतीबाबत आढावा बैठक पार पडली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. केंद्राच्या नियमानुसार बागायती आणि कोरडवाहूसाठी ६ हजार ८०० रुपये दिले जाऊ शकतात. पण आम्ही हेक्टरी १० हजार रुपये मदत देणार आहोत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तर फळबागांसाठी १८ हजार प्रति हेक्टर ही केंद्राच्या नियमानुसार, पण राज्य सरकार २५ हजार प्रति हेक्टर मदत करणार, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केलीये.

Google Ad

दरम्यान, राज्याचे केंद्राकडे ३८ हजार कोटी थकीत असून केंद्राने अजूनही ही रक्कम दिली नसल्याचं म्हटलं आहे. दिवाळीपर्यंत ही मदत देऊ. सणासुदीत बळीराजाच्या डोळ्यात अश्रू ठेवणार नाही, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!