Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

महावितरणचा अनागोंदी कारभार थांबवा … तसेच वीजबिल उशिरा देणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी!

महाराष्ट्र 14 न्यूज : कृषी पर्यावरण शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटना व अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी खिलचंद चौधरी, राहणार शुभारंभ कॉलनी गुरुद्वारा रोड वाल्हेकर वाडी चिंचवड पुणे यांच्या 22 ऑक्टोबर 2020 रोजीच्या तक्रारीनुसार त्यांना व त्यांच्या संपूर्ण कॉलनीला वीज बिल आज दिले गेले आहे. ( दिनांक 22 ऑक्टोबर 2020 रोजी )  व बिल भरण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोबर 2020 होती, तरी महावितरणमधील बिल देणाऱ्या सब कॉन्ट्रॅक्ट कंपन्या अशाप्रकारे जर वीजबिल वितरण करत असतील व नागरिकांना अतिरिक्त पैसे महावितरण’च्या चुकीमुळे भरावे लागत असतील तर संबंधित वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तसेच त्यांच्या ठेकेदारावर त्वरित कार्यवाही व्हावी तसेच अशा नागरिकांची विलंब शुल्क आकारणी करू नये.

तसेच इतरही  ही वाढीव बिल आकारलेली  प्रकरणे समोर येतात  यावरही महावितरणने अंकुश ठेवावा अशी मागणी गजानन बाबर तसेच सचिव गणेश बाबर  ,खजिनदार विठ्ठल रांजणे ,उपाध्यक्ष मिलिंद यादव सोळस्कर, सदस्य  जयवंत पवार,  सदस्य  प्रमेय आर्यमाने ,सदस्य नितीन निंबाळकर, सदस्य ऋतुराज फडतरे ,सदस्य  संजय जाधव ,पश्चिम महाराष्ट्र  विभागीयअध्यक्ष रणजितसिंह देशमुख,  विभागीय अध्यक्ष सचिन कारेकर, जिल्हाप्रमुख आशिष दौंडे  ,युवानेते ऋषिकेश मस्के, युवा नेत्या अश्विनी करे सर्वजीत बोंडगे , यांनी महावितरणकडे केली आहे.

Google Ad

तसेच त्वरित यावर निर्णय घ्यावा व अशा महावितरण’कडून झालेल्या चुकीमुळे नागरिकांवर विलंब शुल्क आकारू नये, तसेच यापुढे याची महावितरणने दक्षता घ्यावी व कमीतकमी आठवडाभर आधी बिल ग्राहकांपर्यंत पोहच होईल याची दक्षता घ्यावी असे निवेदनाद्वारे महावितरणला कळविण्यात आले आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!