Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : कदाचित ही माझे शेवटचे “गुड मॉर्निंग” असेल … कोरोनाने निधनापूर्वी मुंबईतील महिला डॉक्टरची फेसबुक पोस्ट!

महाराष्ट्र 14 न्यूज : शिवडीतील क्षयरोग रुग्णालयात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या डॉ. मनिषा जाधव यांचा हा मेसेज व्हायरल होत आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांचे सोमवारी रात्री मुंबईतील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात निधन झाले. त्या 51 वर्षांच्या होत्या.

त्यांना आपल्या मृत्यूची चाहुल लागली होती का असा ही प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. डॉ मनिषा जाधव यांच्या या पोस्टमुळे नेटकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होते. त्यांचा मृत्यू अनेकांना चटका लावून गेला आहे.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते.

Google Ad

कदाचित ही माझे शेवटचे गुड मॉर्निंग असेल. कदाचित तुम्हाला या ठिकाणी मी पुन्हा भेटू शकणार नाही. सर्वांनी काळजी घ्या. शरीर मृत पावते आत्मा नाही, आत्मा अमर आहे.”

ही पोस्ट लिहिल्याच्या 36 तासानंतर त्यांचे निधन झाले. त्यांच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यांना धीर देणाऱ्या पोस्ट लिहिल्या होत्या.

काळजी करू नका, आपण लवकर बऱ्या व्हाल, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काहीही होणार नाही’ अशा आशयाच्या कमेंट्स करण्यात आल्या होत्या.”
त्यांच्या निधनावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शोक व्यक्त केला आहे. आपण एका चांगल्या डॉक्टरला गमावले आहे असं त्या म्हणाल्या. त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे याची आम्हाला जाणीव आहे असं त्या माध्यमांना म्हणाल्या.

कोरोना रुग्णांची सेवा करता करता अनेक डॉक्टरांना कोरोनाची बाधा होत असल्याचे दिसत आहे. त्यातून अनेक जण आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसत आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

15 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!