Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : दिलदार … आधी प्राण वाचवले आणि आता … कौतुक करावे तेवढे कमीच, जिगरबाज मयुरचा दिलदारपणाने मोठ्या मोठ्या श्रीमंतांना लाजवले!

महाराष्ट्र 14 न्यूज : वांगणी येथे तैनात असलेला पॉइंट्समन मयूर शेळके याने प्रसंगावधान दाखवत स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावर तोल जाऊन पडलेल्या लहान मुलाचा जीव वाचवला. आता मयुरने आणखी एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. जिगरबाज मयुरचा दिलदारपणा मोठ्या मोठ्या श्रीमंतांनी लाजवले असा आहेय यासाठी त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच.

मयूरने दाखवलेल्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे. त्याच्या कामगिरीबद्दल रेल्वेकडून त्याला ५० हजारांचं बक्षीस देण्यात आले आहे. मयूरने यातील २५ हजार रुपये संगीता शिरसाट यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या दिलदारपणाने पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली आहेत.

Google Ad

अंध संगीता शिरसाट या१७ एप्रिलला वांगणी रेल्वे स्थानकाच्या फलाटावरून चालल्या होत्या. फलाटाचा अंदाज न आल्यानं संगीता यांचा मुलगा रुळांवर पडला. तितक्यात समोरून भरधाव रेल्वे येत होती. ट्रेन येत असल्याचे दिसताच मुलाचा अपघात होणार हे समजल्यावर क्षणाचा विलंब न लावता पॉइंटमन मयूर शेळकेने तत्परतेने धाव घेतली. ट्रेन येण्याआधी काही सेकंद मयूर यांनी मुलाला वाचवलं आणि स्वतः देखील प्लॅटफॉर्मवर चढले. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

12 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!