Google Ad
Editor Choice india

कोरोनाचा कहर सुरुच … वर्ल्ड रिकॉर्ड मोडला, 24 तासात सर्वाधिक मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २२एप्रिल) : कोरोनाने हाहाकार माजवला आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. भारतातील कोरोना प्रादुर्भावामुळे रुग्ण वाढीचा वेग थांबताना दिसत नाही. तसेच नवीन कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, भारतात कोविड -19च्या नवीन घटनांनी सर्व वर्ल्ड रिकॉर्ड मोडला गेला आहे. सुमारे 3.16 लाख नवीन बाधित रुग्ण नोंदवले गेले आहेत. कोरोना साथीच्या प्रारंभापासून जगातील कोणत्याही देशापैकी सर्वात जास्त कोरोना रुग्ण आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे भारताची डोकेदु:खी अधिक वाढली आहे.

🔴24 तासांत 3.16 लाख नवीन रुग्ण आणि 2102 मृत्यू

Google Ad

Worldometerने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 3 लाख 15 हजार 925 लोकांना कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे, तर 2102 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर, भारतात कोरोना संसर्ग झालेल्यांची संख्या 1.59 कोटींपेक्षा अधिक आहे, तर 1.84 लाखांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशातील कोविड -19च्या सक्रिय रूग्णांची संख्याही 22.9 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. अशीच रुग्णसंख्या वाढली तर भारतापुढे मोठे संकट उभे राहू शकते. कारण आताच ऑक्सिजनचा तुटवडा जाणत आहे. तसेच बेडही उपलब्ध होत नाहीत.

🔴नवीन रुग्णसंख्येने अमेरिकेचा विक्रम मोडला

‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या आकडेवारीनुसार, कोविड -19मधील नवीन कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढल्याने अमेरिकेचा विक्रम मोडला गेला आहे. अमेरिकेपेक्षा प्रथमच 3 लाखांचा टप्पा ओलांडला. यापूर्वी 8 जानेवारी रोजी अमेरिकेत सर्वाधिक 3 लाख 7 हजार 581 नवीन कोरोनाबाधितांची संख्या नोंदली गेली.

🔴अमेरिकेपेक्षा भारतात झपाट्याने वाढ

भारतात अमेरिकेच्या तुलनेत नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे आणि कोरोनाबाधितांचा दररोजचा आकडा 1 लाखांवरुन 3 लाखांवर पोहोचला आहे. त्यासाठी केवळ 17 दिवसांचा कालावधी लागला आहे. या काळात दररोजच्या प्रकरणांमध्ये 6.76 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 1 लाख ते 3 लाख दैनंदिन नवीन रुग्ण वाढीसाठी अमेरिकेत 67 दिवस लागले आणि या काळात कोरोनाबाधितांचा आकडा दररोजचा विचार करता वाढीचे प्रमाण 1.58 टक्के होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

4 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!