Google Ad
Editor Choice Maharashtra

Mumbai : क्रिकेटमध्ये करिअर करता न आल्याने मुंबईत तरुणाची आत्महत्या

महाराष्ट्र 14 न्यूज : क्रिकेटमध्ये करिअर करता आले नाही म्हणून मुंबईत एका तरुणाने आत्महत्या केली. मुंबईतील मालाड पूर्वेत २७ वर्षाच्या सिटी क्रिकेटर करण तिवारी या तरुणाने सोमवारी रात्री आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. कोरोनामुळे करिअरमध्ये आयपीएल किंवा मोठ्या मॅचमध्ये खेळायची संधी हुकल्याने करण तिवारीनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

या तरुणाने शेवटचा फोन राजस्थानमध्ये असलेल्या आपल्या मित्राला केला होता. मी मानसिक तणावात असून मी आत्महत्या करत असल्याचं त्याने मित्राला सांगितलं. यानंतर मित्राने लगेच करणच्या बहिणीला सांगितलं. हे कळताच करणच्या बहिणीने आईला हा प्रकार सांगितला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. आईने घराचं दारं उघडलं आणि समोर करणचा मृतदेह होता. पुढील तपास कुरार पोलिस करत आहेत.

Google Ad

Tags
Google Ad

About the author

Maharashtra14 News

125 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!