Google Ad
Editor Choice Education Maharashtra

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता प्रथम वर्ष अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुरुवात … एमएचटी-सीईटी २०२१ प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची येथे करा नोंदणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९जून) : कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून राज्यात सध्या अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने विविध विद्याशाखांमधील प्रवेश प्रक्रिया सुरु केली आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी 2021 साठी अर्ज नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. अर्जाची नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होईल. https://mhtcet2021.mahacet.org या वेबसाईटला भेट देऊन विद्यार्थी आपली नोंदणी करु शकतील.

अर्जनोंदणीला 8 जूनपासून सुरुवात

Google Ad

अभियांत्रिकी/तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी ही प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी 8 जूनपासून अर्जाची नोंदणी सुरु झाली आहे. अर्ज करण्यासाठीचा शेवटाचा दिवस हा 7 जुलै 2021 असेल. तशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन दिली आहे. अर्ज नोंदणीसाठी उमेदवारांना https://mhtcet2021.mahacet.org या लिंकला भेट द्यावी लागेल.

अर्ज कसा कसा करावा ?

MHT CET 2021 साठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम http://mhtcet2021.mahacet.org या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
त्यासाठी MHT CET 2021 registration येथे क्लिक करा
त्यानंतर सर्व आवश्यक असलेली माहिती व्यवस्थित भरा आणि सेव्ह वर क्लिक करा.
MHT CET 2021 application form भरण्यासाठी अ‌ॅप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाका.
त्यानंतर अर्जासाठीची फी ऑनलाईन पद्धतीने भरून सबमीट या बटणावर क्लिक करा.
तुम्ही भरलेल्या अर्जाची एक प्रिटं काढून घ्या..

Google Ad

About the author

Maharashtra14 News

86 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!