Google Ad
Editor Choice Sports

पिंपरी चिंचवड चे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकविल्याबद्दल शालेय बुद्धिबळ प्रशिक्षक ‘केशव अरगडे’ यांचे आमदारांनी केले कौतुक!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९जून) : २१ मे ते २३ मे २०२१ दरम्यान जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या शैक्षणिक बुद्धिबळ समितीने युरोप मधून घेतलेल्या ऑनलाईन शालेय बुद्धिबळ प्रशिक्षक पदवी परिक्षेत ७०%गुण प्राप्त करुन यश प्राप्त केल्याबद्दल तसेच अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन चेस इन स्कूल ट्रेनर पदवी परिक्षेत यशस्वी झाल्याबद्दल साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूलचे शारिरीक शिक्षण व क्रिडा शिक्षक केशव प्रभाकर अरगडे यांचे पिंपरी विधानसभेचे आमदार आदरणीय आण्णा बनसोडे यांच्या हस्ते कौतुक करण्यात आले.

तसेच ह्या दोन्ही परिक्षा अवघड समजल्या जातात कारण यामध्ये उतीर्ण होण्यासाठी ६५% मार्क्स ची आवश्यकता लागते. यावेळी आमदार साहेबांनी अरगडे याना आपल्याला ह्या पदापर्यंत पोहचण्यासाठी काय काय अडचणी आल्या इथपर्यंतचा प्रवास कसा झाला याची माहिती घेतली, तसेच बुद्धिबळ क्षेत्रात पुढे काय करायचे आहे,

Google Ad

आपल्या विधानसभा क्षेत्रात तसेच संपूर्ण शिक्षण क्षेत्रात बुद्धिबळाच्या माध्यमातून काय करता येईल त्याबाबतीत ही चर्चा केली, तसेच अरगडे सरांची पुढील स्वप्ने व ध्येय याबाबतीत ही जाणून घेतले. तसेच पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या आणि पिंपरी चिंचवड चे नाव बध्दीबळ क्षेत्रात जागतिक पातळीवर नेल्या बद्दल कौतुक केले व पुढील कार्यासाठी मदतीचे आश्वासन दिले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

58 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!