Google Ad
Editor Choice Pune

Pune : मान्सूनपूर्व कामांबाबत महापौर मुरलीधर मोहोळ समाधानी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२ मे) : शहरात गेल्या तीन वर्षांतील पावसाची स्थिती लक्षात घेता कमी वेळात अधिक पाऊस असे प्रकार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात मान्सून पूर्व कामे वेगाने सुरु असून त्यामध्ये सद्यस्थितीला समाधानकारक काम केले आहेत. तसेच उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करा, असे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. शिवाय गेल्या दोन वर्षांसारखी परिस्थिती उद्भवू देऊ नका, असे स्पष्ट आदेशही महापौर मोहोळ यांनी दिले आहेत.

शहरातील मान्सून पूर्व कामांचा आढावा महापौर मोहोळ यांनी प्रशासनाकडून घेत विविध सूचनाही दिल्या आहेत. महापौर मोहोळ म्हणाले, ‘पाणी साठणारी धोकादायक ठिकाणे, नाला खोलीकरण, गाळ काढणे, नाला रुंदीकरण, नाल्यातील अतिक्रमणे, कात्रज तलावातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवणे, ड्रेनेज लाईन आणि चेंबर स्वच्छ करणे आदी कामांचा आढावा झोननिहाय घेतला.

Google Ad
Google Ad

About the author

Maharashtra14 News

35 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!