Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

मारुती कवडे, डॉ . देविदास शेलार , सुरेश तात्याबा शिंदे, भाऊसाहेब जाधव, श्रीकांत पवार यांची भाजपच्या सांगवी-काळेवाडी मंडल पदाधिकारीपदी नियुक्ती!

महाराष्ट्र 14 न्यूज : तब्बल ७२ सदस्य असलेली सांगवी – काळेवाडी मंडल भाजपची नवी जम्बो कार्यकारिणी जाहीर केल्याची माहिती शहर अध्यक्ष ‘आमदार महेश लांडगे’ यांनी दिली. जनमानसात स्थान असलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन भाजपने कार्यकारणीचे गठण केल्याचे यावेळी दिसून आले.

चिंचवड विधानसभा मतदार संघातील सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, राहटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी या भागाचा या कार्यकारणीत समावेश असून, आगामी काळातील पक्षाची ध्येयधोरणे डोळ्यासमोर ठेवून ‘आमदार लक्ष्मण जगताप’ आणि ‘आमदार महेश लांडगे’ यांच्या मार्गदर्शनाखाली या जम्बो कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.

Google Ad

शुक्रवारी (ता.१८ सप्टेंबर ) पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक ३१ ( नवी सांगवी – पिंपळे गुरव ) मधील मारुती कवडे यांची भाजपच्या प्रभाग ३१ अध्यक्षपदी तर सांगवी काळेवाडी मंडल उपाध्यक्षपदी डॉ. देविदास शेलार, सुरेश तात्याबा शिंदे तसेच चिटणीस पदी भाऊसाहेब जाधव, शामराव धस ,श्रीकांत पवार यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपा शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

सांगवी काळेवाडी मंडलचे ‘अध्यक्ष विनोद तापकीर’ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले, तर मुख्य संगठक अमोल थोरात यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमावेळी आमदार लक्ष्मण जगताप, भाजपा शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे तसेच विविध आघाड्यांचे नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

11 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!