Google Ad
Editor Choice Pimpri Chinchwad

पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या वतीने ७२ पदाधिकाऱ्यांची’सांगवी -काळेवाडी मंडल’ जम्बो कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र 14 न्यूज : तब्बल ७२ सदस्य असलेली सांगवी – काळेवाडी मंडल भाजपची नवी जम्बो कार्यकारिणी जाहीर केल्याची माहिती शहर अध्यक्ष ‘आमदार महेश लांडगे’ यांनी दिली. जनमानसात स्थान असलेल्या कार्यकर्त्यांना घेऊन भाजपने कार्यकारणीचे गठण केल्याचे यावेळी दिसून आले.

चिंचवड विधानसभा मतदार संघातील सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव, राहटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी या भागाचा या कार्यकारणीत समावेश असून, आगामी काळातील पक्षाची ध्येयधोरणे डोळ्यासमोर ठेवून आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या जम्बो कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.

Google Ad

आज पक्षाच्या वतीने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आली, सांगवी काळेवाडी मंडलचे ‘अध्यक्ष विनोद तापकीर’ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले, तर मुख्य संगठक अमोल थोरात यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमावेळी आमदार लक्ष्मण जगताप, भाजपा शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन,माजी स्थायी समिती अध्यक्ष राजेंद्र राजापुरे तसेच नवनियुक्त पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंडलाध्यक्ष विनोद तापकीर म्हणाले, ‘लक्ष्मण भाऊंनी माझ्यावर जी जबाबदारी दिली आहे, ती मी प्रामाणिक आणि योग्य प्रकारे सार्थ करील असा विश्वास देतो.

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, ‘ संघटनेशिवय कोणत्याही पक्षला महत्त्व नसते, जेवढी संघटना मजबूत तेवढा पक्ष मजबूत, संघटनेत काम करताना एकमेकांना मदत करणे हे महत्त्वाचे आहे, त्यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा दाखला दिला.

आमदार महेश लांडगे म्हणाले, ‘कोरोनाच्या संसर्ग काळात सर्वांनी सहकार्य केले, पक्षाचे संदेश ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहचविण्यात कार्य आपण केले पाहिजे, सांगवी काळेवाडी मंडलात सर्वसामान्य नागरिक राहतात, त्यांना आपण कोरोनाच्या संसर्ग काळात मदतीचा हात दिला. तसेच काळेवाडी भागात भविष्यात चारही नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे असतील, असे काम विनोद तापकीर यांच्या कार्यातून दिसून येत आहे. तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे अभियान कार्यक्रम सर्व नागरिकांपर्यंत पोहचविण्यात आपण सर्वांनी हातभार लावला पाहिजे.

यावेळी भाजपा च्या वतीने सर्व समाजघटकांना सामावून घेत नव्या व जुन्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ही कार्यकारणी तयार केल्याचे दिसून आले. जम्बो कार्यकारिणीतील १३ विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी नियुक्ती पत्र देण्यात आली. यात दक्षिण भारतीय आघाडी, ओबीसी मोर्चा,महिला आघाडी, शिक्षक आघाडी, वैद्यकीय आघाडी, वकील आघाडी, व्यापारी आघाडी, अल्पसंख्याक आघाडी, ट्रान्सपोर्ट आघाडी, झोपडपट्टी आघाडी तसेच मंडल अध्यक्ष युवामोर्चा, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, संघटक सरचिटणीस, सरचिटणीस, चिटणीस यात ७२ पदाधिकाऱ्यांची निवड यावेळी करून आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

18 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!