Google Ad
Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिखली येथील आर्थिकदृषट्या दुर्बल घटकांसाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पातील सदनिकांची झाली सोडत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २३ सप्टेंबर २०२१) : पिंपरी चिंचवड महापालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या घरकुलातील सदनिकेचा वापर योग्य पध्दतीने करावा, त्यांची विक्री करु नये अथवा भाड्याने देऊ नये असे आवाहन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिखली येथील आर्थिकदृषट्या दुर्बल घटकांसाठी उभारण्यात आलेल्या प्रकल्पातील सदनिकांची सोडत त्यांच्या हस्ते आज अॅटोक्लस्टर चिंचवड येथे झाली त्यावेळी त्या बोलत होत्या.

Google Ad

यावेळी उपमहापौर नानी उर्फ हिराबाई घुले, जैव विविधता व व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उषा मुंढे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप आदी उपस्थित होते.

महानगरपालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी विविध प्रकल्प उभारले आहेत.  या घरकुल प्रकल्पामुळे पिंपरी चिंचवड शहरातील घराचे स्वप्न साकार झाले आहे.  या निमित्ताने झालेला आनंद लाभार्थ्यांच्या चेह-यावर मला दिसत असल्याचे महापौर माई ढोरे म्हणाल्या.  स्वत:ला राहण्यासाठी या घरकुलाचा वापर लाभार्थ्यांनी करावा त्याची विक्री करु नये अथवा भाड्याने देऊ नये परिसर स्वच्छ व सुंदर ठेऊन आपल्या स्वत:च्या घराचा आनंद लाभार्थ्यांनी घ्यावा असेही त्या म्हणाल्या.  यावेळी तात्पुरत्या स्वरुपात निवड करण्यात आलेल्या सोसोयटी क्र १४० इमारत क्रमांक बी ९ चे अध्यक्ष विजय हरीभाऊ कदम व बी १० चे अध्यक्ष अनिल दगडू सरवदे यांचा सत्कार करण्यात आला.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

66 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!