Google Ad
Editor Choice

मराठवाडा विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार यांचा राष्ट्रवादीत प्रवेश …मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत हातात बांधले घड्याळ! 

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ सप्टेंबर) : मराठवाडा जन संघाचे अध्यक्ष अरुण पवार, भाजपा सह्याद्री आदिवासी मंडळाचे विष्णू शेळके, मोशीतील भाजपचे युवक कार्यकर्ता ज्ञानेश्र्वर बोऱ्हाडे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष असलेल्या अरुण पवार यांना प्रवेश देऊन राष्ट्रवादीने शहरात मोठ्या संख्येने असलेल्या मराठवाड्यातील मतदारांवर जाळे फेकले आहे. अरुण पवार हे भाजपच्या सांगवी-काळेवाडी मंडलाचे माजी अध्यक्ष होते. संघाच्या माध्यमातूनही सामाजिक कार्य करीत आहेत. एकूणच महापालिकेतील सत्ता टिकवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यातूनच त्यांनी काल पूर्वीच्या आपल्या मित्रपक्षाचा पदाधिकारी फोडला.

Google Ad

दुसरीकडे गेलेली राष्ट्रवादीची सत्ता पुन्हा आणण्यासाठी अजित पवारही कामाला लागले आहेत. त्यांनी भाजपमध्ये २०१७ ला गेलेल्या आपल्या मंडळींची घरवापसी करण्याचे ठरवले आहे. नगरसेवकांचे हे घाऊक इनकमिंग वर्ष अखरीस होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी पक्षांतर कायद्याच्या कचाट्यात सापडणार नाहीत, असे प्रतिस्पर्धी पदाधिकाऱ्यांचे प्रवेश करून घेतले जात आहेत. नुकताच पक्षांतरबंदीचा फटका बसणार नाही,असा भाजपशी संलग्न अपक्ष नगरसेवकांचा गटनेता कैलास बारणे यांना राष्ट्रवादीने पक्षात घेतले. तर, त्याअगोदर माजी नगरसेवक संतोष बारणे आणि राजू लोखंडे यांच्याही हातावर राष्ट्रवादीने आपले घड्याळ बांधले आहे. या दोघांच्याही पत्नी भाजपच्या नगरसेविका आहेत.

पवार व बोराडेसह विष्णू शेळके या भाजपच्या प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यानेही मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत हातात घड्याळ बांधले. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, अतुल शितोळे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, पक्षाचे शहर मुख्य संघटक अरुण बोऱ्हाडे यांच्या उपस्थितीत वरील तिघांनी आपल्या समर्थकांसह प्रवेश केला. अजित पवार आणि राष्ट्रवादीमुळे शहराचा विकास होईल,असे वाटल्याने आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला,असे अरुण पवार यांनी सांगितले.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

1 Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!